पोट धरून हसायला व्हा तय्यार ! ‘गोलमाल 5’ बद्दल मोठी अपडेट, ‘या’ तारखेला रिलीज होणार चित्रपट

| Updated on: Feb 29, 2024 | 1:16 PM

बॉलिवूडमधील अनेक कॉमेडी चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. जुना गोलमाल आणि नव्या गोलमालचेही लोकांच्या हृदयात खास स्थान आहे. नव्या गोलमालचे तर अनेक भाग निघाले. त्याच फ्रँचायझीमधील नवा भाग अर्थात गोलमाल 5 बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. गोलमाल 5 कधी रिलीज होणार याचा खुलासा अभिनेता श्रेयस तळपदेने केला आहे. या अभिनेत्याने चित्रपटाच्या शूटिंगची माहितीही शेअर केली आहे.

पोट धरून हसायला व्हा तय्यार ! ‘गोलमाल 5’ बद्दल मोठी अपडेट, या तारखेला रिलीज होणार चित्रपट
Follow us on

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : गोलमाल है भाई सब गोलमाल है… हे ऐकलं की आपल्यापैकी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुटतं. अमोल पालेकरांचा जुना ‘गोलमाल’ जेवढा लोकप्रिय झाला, तेवढाच लोकप्रिय नवा ‘गोलमाल’ही झालाच. नव्या ‘गोलमाल’ची तर फ्रँचायझीच निघाली. अजय देवगण, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू ,तुषार कपूर यांच्या भन्नाट अभिनयाने आणि कॉमेडीने लोकांना पोट दुखेस्तोवर हसवलं. त्यामुळेच चाहते या चित्रपटाच्या नव्या भागाची आतुरतेने वाट बघत असतात. आता याच पिक्चरबद्दल अर्थात ‘गोलमाल 5’ एक नवी अपडेट समोर आली आहे. अजय देवगण आणि त्याची पलटन परत एकदा आपल्याला सर्वांना हसवताना दिसणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदेने यासंदर्भात मोठे अपडेट्स दिले आहेत.

कधी होणार पिक्चर रिलीज ?

या चित्रपटाचा नवा भाग कधी रिलीज होणार याची प्रत्येक चाहत्यालाच उत्सुकता होती. गोलमाल फ्रँचायझीचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने 2020 मध्ये सांगितलं होत की ‘गोलमाल 5’ चित्रपटाचं काम सुरू आहे. पण त्यानंतर काहीच माहिती समोर आली नाही. आता तब्बल चार वर्षांनी या चित्रपटाबद्दल नवे अपडेट समोर आले आहेत. या पिक्चरमध्ये लक्ष्मणची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याने नुकताच एका मुलाखतीत ‘गोलमाल 5’बद्दल खुलासा केला. या चित्रपटाचे शूटिंग पुढल्या वर्षी सरू होण्याची शक्यता असून 2025 साली दिवाळीच्या आसपास हा पिक्चर रिलीज होऊ शकतो.

श्रेयसच्या म्हणण्यानुसार, पॅनडॅमिकच्या काळात ‘गोलमाल 5’ची अनाऊन्समेंट झाली होती. पण तेव्हाची परिस्थिती पाहता, सगळे प्लान्स बदलावे लागले. हा चित्रपट माझ्यासाठी अतिशय खास असून शूटिंगच्या वेळी, सेटवर खूप धमाल येत असल्याचेही श्रेयसने नमूद केले. कधी-कधी मी इतका हसायचो की मला काही वेळा डायलॉग्सही बोलता यायचे नाहीत, अशी आठवणही त्याने सांगितली. या चित्रपटाचे आत्तापर्यंतचे चारही भाग हिट झाले असून आता चाहते ‘गोलमाल 5’ची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

कॉमेडीबद्दलही श्रेयसने त्याचं मत व्यक्त केलं. आता कॉमेडीमध्ये खूप बदल झाला आहे. गोलमाल किंवा हाऊसफुल सारख्या चित्रपटांपूर्वी अनेक मल्टी स्टारर कॉमेडी पिक्चर आले. श्रेयस तळपदेच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरच एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच याशिवाय तो वेलकम टू द जंगल या मल्टीस्टारर चित्रपटातही दिसणार आहे.