वाढदिवस श्वेता बच्चनचा, चर्चा मात्र ऐश्वर्या रायचीच… सेलिब्रेशनमध्ये कुठेच दिसली नाही बच्चन बहू..

| Updated on: Mar 18, 2024 | 10:02 AM

श्वेता बच्चनने 17 मार्च रोजी तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमधील अनेकांनी तिला आपापल्या शैलीत श्वेता बच्चनला शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी बच्चन कुटुंबाने त्यांच्या लेकीसाठी पार्टी दिली. या पार्टीला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली पण श्वेताची वहिनी ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन मात्र या पार्टीपासून दूरच होते.

वाढदिवस श्वेता बच्चनचा, चर्चा मात्र ऐश्वर्या रायचीच... सेलिब्रेशनमध्ये कुठेच दिसली नाही बच्चन बहू..
Follow us on

मुंबई | 18 मार्च 2024 : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांची लाडकी लेक श्वेता बच्चन हिने काल, म्हणजेच 17 मार्च ला तिचा 50वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी तिच्यावर प्रियजनांकडून आणि बॉलिवूडमधील अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. प्रत्येकानी अनोख्या शैलीत श्वेता बच्चन हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्वेताची लेक नव्या हिनेनही सोशल मीडियावर आईसाठी पोस्ट लिहीत शुबेच्छा दिल्या. तर श्वेताच्या 50व्या वाढदिवसानिमित्त बच्चन कुटुंबियांनी संध्याकाळी एक नाशदार पार्टी देण्यात आली. त्यासाठी अमिताभ बच्चन, जया बच्चन, नव्या नंदा, तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धांत चतुर्वेदी, गौरी खान, करण जोहर यांसारखे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र तरीही पार्टीत बच्चन कुटुंबाचा लाडका लेक अभिषेक आणि श्वेताची वहिनी ऐश्वर्या राय हे अनुपस्थित होते. त्यांचे पार्टीला न येणे हे चर्चेचा विषय ठरला.

बच्चन कुटुंबात गेल्या काही काळापासून सगळं काही आलेबल नसल्याची चर्चा सुरू आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांचा एक बंगला श्वेता हिच्या नावावर केला तेव्हापासूनच सगळं बिनसल्याचं वृत्त येऊ लागलं. श्वेता बच्चन आणि बच्चन कुटुंबाची सून , ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात विस्तव जात नसल्याची चर्चाही अनेक काळापासून आहे. बऱ्याच वेळा त्या दोघी एकत्र दिसल्या,मात्र त्यांच्यादरम्यान टेन्शन असल्याचंही वृत्त समोर येत होतं. श्वेतामुळे ऐश्वर्या नाराज असून, अभिषेक आणि ऐश्वर्याचा घटस्फोटाच्या बातम्यांनीही काही काळापूर्वी जोर धरला होता. मात्र बच्चन कुटुंब, अभिषेक किंवा ऐश्वर्या कोणीच त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही, मौनही सोडले नाही. थोडे दिवसांपूर्वी अंबानींच्या प्री-वेडिंग बॅशमध्ये सगळे एकत्र दिसले तेव्हा बच्चन कुटुंबात सगळं नीट झाल्याचं लोकांना वाटलं.

चर्चा तर होणारच ! 

मात्र काल श्वेता बच्चनच्या 50व्या वाढदिवसाच्या पार्टीत अभिषेक-ऐश्वर्याच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा चर्चा झाली. श्वेता, तिची मुलं, तिचे आई वडील अमिताभ आणि जया बच्चन, तसेच सिद्धांत चतुर्वेदी, करण जोहर, मनिष मल्होत्रा, गौरी खान, सुहाना खान असे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हे श्वेताच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी उपस्थित होते. श्वेताचा भाऊ अभिषेक बच्चन याने सोशल मीडियावरून एक क्यूट फोटो शेअर करत श्वेतासाठी पोस्ट तर लिहीली.

 

मात्र तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन किंवा आराध्या यांच्यापैकी कोणीच न आल्याने बच्चन कुटुंबात अजूनही टेन्शनचं वातावरण आहे का ? श्वेता-ऐश्वर्याचं अजूनही बिनसलंय का ? अशाच चर्चा कालपासून सुरू आहेत. बच्चन बहूच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्न पुन्हा निर्माण झाले आहेत.