सावत्र वडील आणि आईच्या ‘सोशल’ भांडणाला वैतागली पलक तिवारी, डिलीट केलं इंस्टाग्राम अकाऊंट!

| Updated on: May 26, 2021 | 12:09 PM

टीव्ही जगातील प्रसिद्ध ‘बहू’ अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सध्या 'खतरों के खिलाडी'मध्ये आपला जलवा दाखवत आहे. पण दुसरीकडे तिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) हिने आपले सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले आहे.

सावत्र वडील आणि आईच्या ‘सोशल’ भांडणाला वैतागली पलक तिवारी, डिलीट केलं इंस्टाग्राम अकाऊंट!
पलक तिवारी
Follow us on

मुंबई : टीव्ही जगातील प्रसिद्ध ‘बहू’ अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सध्या ‘खतरों के खिलाडी’मध्ये आपला जलवा दाखवत आहे. पण दुसरीकडे तिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) हिने आपले सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले आहे. आई आणि सावत्र पिता यांच्यात सततच्या भांडणा;आ कंटाळून तिने हे कठोर पाऊल उचलले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे (Shweta Tiwari daughter Palak Tiwari delet her instagram account).

सध्या पलक तिवारीची आई अर्थात अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) यांच्यात खूप वाद सुरु आहेत. सोशल मीडियावर या वादाचे चर्चा पाहायला मिळत आहे. या चर्चांना वैतागूनच पलकने आपले अकाऊंट डिलीट केले असावे, असे म्हटले जात आहे.

श्वेता आणि अभिनवचे वाढते वाद

गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिवारी तिचा एक्स-पती अभिनव कोहलीशी सतत वाद वाढत आहे. अभिनव सतत श्वेतावर आरोप-प्रत्यारोप करत आहे आणि तिच्यावर हल्ला बोल करत आहे. एवढेच नाही तर, अभिनवने श्वेताच्या या शोमध्ये सहभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

अभिनव आणि श्वेताची बाचाबाची

अभिनवने श्वेताला विचारले की, अभिनेत्रीने या शोमध्ये सामील होण्यासाठी आपल्या 4 वर्षाच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडले. ज्यांची माहिती त्यांना देण्यात आलेली नाही. त्याचवेळी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना श्वेताने स्पष्टपणे सांगितले होते की, शोमध्ये सामील होण्यापूर्वी तिने अभिनवला कळवले होते. तसेच श्वेताने असेही सांगितले होते की, आपला मुलगा कुटुंबासमवेत सुरक्षित आहे.

पलकने डिलीट केले अकाऊंट

त्याचबरोबर या सर्वांचा परिणाम श्वेताची मुलगी पलक तिवारीवर हीच्यावरही होताना दिसत आहे. पलक लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे आणि यामुळे सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय झाली होती. पण अचानक पलकने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे (Shweta Tiwari daughter Palak Tiwari delet her instagram account).

श्वेताचे अभिनववर गंभीर आरोप

पलक हिचे अकाऊंट डिलीट केल्यानंतर असे अनुमान वर्तवले जात आहे की, याचे कारण तिची आणि अभिनव कोहली यांच्या मधील भांडण असू शकते. अश्लील भाषेत बोलणे, तिला मारहाण करणे असे आरोप करत श्वेताने अभिनवचे घर सोडले आहे. पण श्वेताच्या आरोपानंतर अभिनवनेही पाठपुरावा सुरू केला हाये, जो आजपर्यंत सुरु आहे.

कोण आहे श्वेता तिवारी ?

श्वेता तिवारीने 2001 साली ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून करिअरला सुरुवात केली. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाची ती विजेतीही ठरली होती. याशिवाय अनेक मालिका, रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. श्वेता तिवारीने नऊ वर्षांच्या संसारानंतर 2007 मध्ये पहिला पती राजा चौधरीसोबत घटस्फोट घेतला होता. दारुच्या नशेत राजा मारहाण करत असल्याचं श्वेता सांगत असे.

2010 पासून श्वेता अभिनवला डेट करत होती. 2013 मध्ये श्वेता आणि अभिनव विवाहबंधनात अडकले. नोव्हेंबर 2016 मध्ये श्वेता आणि अभिनव यांना मुलगा झाला. मात्र दोघांच्या नात्यात वितुष्ट आल्याने त्यांनी घटस्फोट घेतला.

(Shweta Tiwari daughter Palak Tiwari delet her instagram account)

हेही वाचा :

Photo : अनुपमा फेम मदालसाला मिळालं खास सरप्राईज, सेटवर कुटुंबियांची हजेरी

Photo : ‘सुंदरा मनामध्ये भरली’, अभिनेत्री अक्षया नाईकचा ग्लॅमरस अवतार पाहिलात?

&