Sidhu moose wala : मृत्यूच्या दीड वर्षानंतर सिद्धू मुसेवाला यांचं नवं गाणं, एका तासात इतक्या लाख लोकांनी पाहिलं

| Updated on: Nov 12, 2023 | 4:16 PM

सिद्धू मूसवाला यांची मे 2022 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांची काही गाणी रिलीज झाली आहेत. आता दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांसाठी सिद्धू मूसवालाकडून ही खास भेट आहे. वॉचआउट असे या गाण्याचे शीर्षक आहे. हे गाणे रिलीज होऊन 2 तासही उलटले नाहीत आणि 22 लाखांहून अधिक लोकांनी ते पाहिले आहे.

Sidhu moose wala : मृत्यूच्या दीड वर्षानंतर सिद्धू मुसेवाला यांचं नवं गाणं, एका तासात इतक्या लाख लोकांनी पाहिलं
सिद्धू मुसेवाला यांचे नविन गाणे
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा टायगर 3 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.  नुकताच साऊथचा मेगास्टार रजनीकांत यांच्या लाल सलाम या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला. आता पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu moose wala Watch Out) यांच्या निधनानंतर जवळपास दीड वर्षांनी त्यांचे वॉच आउट हे नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे खास दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यांसाठी रिलीज करण्यात आले आहे. चाहत्यांनासुद्धा हे गाणे खुप आवडे आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर अवघ्या तासाभरात 2 दशलक्षाहून अधिक लोकांनी ते ऐकले आहे. दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांना सिद्धू मुसेवाला यांनी सरप्राईज दिले असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

सिद्धू मूसवाला यांची मे 2022 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांची काही गाणी रिलीज झाली आहेत. आता दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांसाठी सिद्धू मूसवालाकडून ही खास भेट आहे. वॉचआउट असे या गाण्याचे शीर्षक आहे. हे गाणे रिलीज होऊन 2 तासही उलटले नाहीत आणि 22 लाखांहून अधिक लोकांनी ते पाहिले आहे. हे गाणे चाहत्यांमध्ये वेगाने व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

 

चाहते झाले भावुक

सिद्धू मूसवाला यांनी दमदार आवाजाने चाहत्यांना ताजेतवाने केले. तसेच चाहते त्यांच्या आवडत्या गायकाची आठवण करून भावूक होताना दिसत आहेत. चाहते कमेंट्समध्ये आपल्या भावना व्यक्त करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले – रेस्ट इन पॉवर जट्टा. दुसर्‍या व्यक्तीने लिहिले- एका तासात 2.1 दशलक्ष दृश्ये. मृत्यूसुद्धा एखाद्या व्यक्तिमत्त्वाला प्रसिद्ध होण्यापासून रोखू शकत नाही.

सिद्धू मूसवाला हे एक लोकप्रिय पंजाबी गायक होते. ते जगभरातील तरुणांमध्ये लोकप्रिय होते. मे 2022 मध्ये, जेव्हा ते बाहेरगावी त्यांच्या थार या गाडीने प्रवास करत होते, तेव्हा त्याच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्त्या करण्यात आली. या प्रकरणात गोल्डी ब्रारचे नाव पुढे आले होते. आजही चाहते सिद्धू मूसवालाला न्याय मिळावा म्हणून याचना करत आहेत. हे गाणे ऐकून त्याचे चाहते पुन्हा एकदा भावूक झाले. मूसवाला यांनी सणासुदीच्या दिवशी चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणले हे मात्र खरं.