गोविंद ठाकूर, मुंबईः क्रिकेटपटू पृथ्वी शॉला झालेल्या धक्काबुक्कीनंतर मुंबईत गायक सोनू निगमलाही (Sonu Nigam) सेल्फीसाठी धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. सेल्फी घेण्यासाठी धडपड सुरु असताना सोनू निगम याचा सहकारी रब्बानी खान (Rabbani Khan) हा जखमी झाल्याचं वृत्त आहे. या घटनेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदार (MLA) पुत्राचं नाव चर्चेत आहे. सोनू निगमने चेंबूर पोलीस ठाण्यात यासंबंधीचं FIR दाखल केलं आहे. गायक सोनू निगमला झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. सेल्फी घेण्यासाठी ही धक्काबुक्की झाल्याचं कारण सध्या समोर आलंय.
गायक सोनू निगमचा चेंबूर येथे एक लाइव्ह परफॉर्मन्स होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर सोनू निगम त्याच्या सहकाऱ्यांसोबत बाहेर निघाला. पायऱ्यांवरून उतरताना ही घटना घडली. त्यानंतर सोनू निगमने माध्यमांना प्रतिक्रियादेखील दिली आहे. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, यावेळी धक्काबुक्की झाली नाही. पण मी तक्रार दाखल केली आहे. एखाद्यासोबत जबरदस्तीने सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणं, हे किती चुकीचं आहे. त्यानंतरच हमरी-तुमरी, धक्काबुक्की होते.
Sonu Nigam records his statement at Chembur police station regarding the incident that took place at his live concert @SonuNigamForum @SonuNigamSpace @Real_SonuNigam #sonunigam #SonuNigam pic.twitter.com/lRdl8gctFD
— Surya V Ravane (@SuryaRavane) February 21, 2023
सोनू निगम म्हणाला, मला सेल्फी घ्यायचा असं सांगण्यात आलं. मी नको म्हटल्यानंतर समोरच्या व्यक्तीनं मला पकडलं, त्यानंतर कळलं की तो आमदार प्रकाश प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्निल प्रकाश फातर्पेकर आहे. मला वाचवण्यासाठी सहकारी हरि प्रसाद तिथे आले. त्याने हरिला धक्का दिला. त्यानंतर त्याने मला धक्का दिला. मी खाली पडलो. मला वाचवण्यासाठी रब्बानी आले तर त्यांनाही धक्का देण्यात आला. ते बालंबाल वाचले. अन्यथा त्यांना गंभीर इजा झाली असती. त्यात त्यांचे प्राणही जाऊ शकत होते. सुदैवाने काही अघटित घडले नाही.
दरम्यान, काल रात्री झालेल्या धक्काबुकी नंतर प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर पुत्राचे नाव या प्रकरणी चर्चेत आहे. या घटनेनंतर सोनू निगमने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या सोनू निगमच्या घरा बाहेरही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, गायक सोनू निगमला झालेल्या धक्काबुक्कीनंतर या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. सेल्फी घेण्यासाठी ही घटना घडली की आणखी काही कारण होतं, यासंबंधीचा तपास सुरु आहे. घटना नेमकी का घडली, याचा तपास पोलीस करत आहेत.