ऐकलंत का? तुमच्या लाडक्या ‘चिंटू’ला आवाज हवाय, मग बालमित्रांनो तयार व्हा आणि ऑडिशन द्या!

| Updated on: May 07, 2021 | 2:47 PM

चिंटूची ही धमाल आता आपल्याला आणि चिमुकल्या बालमित्रांना गोष्टीरुपात ऐकताही येणार आहेत. यातील चिंटूच्या आवाजासाठी सध्या त्याच्यासारख्याच चिमुकल्या आवाजाचा शोध घेतला जात आहे.

ऐकलंत का? तुमच्या लाडक्या ‘चिंटू’ला आवाज हवाय, मग बालमित्रांनो तयार व्हा आणि ऑडिशन द्या!
चिंटू
Follow us on

मुंबई : तुम्ही-आम्ही सर्वांनीच बालपणी चिमुकल्या ‘चिंटू’च्या गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या आहेत. या गोष्टींमधील ‘चिंटू’ (Chintoo) आणि त्याच्या दोस्तांची धमाल यांनी नेहमीच आपलं मनोरंजन केलं. हा धमाल चिंटू, पुस्तक आणि चित्रपटाच्या माध्यमातूनही आपल्या भेटीस आला होता. आता लवकर पुन्हा एका चिंटूच्या खोड्या आणि धमाल एका वेगळ्या रुपात अनुभवता येणार आहे (Snovel Creation searching voice for Chintoo character know the audition process).

चिंटूची ही धमाल आता आपल्याला आणि चिमुकल्या बालमित्रांना गोष्टीरुपात ऐकताही येणार आहेत. यातील चिंटूच्या आवाजासाठी सध्या त्याच्यासारख्याच चिमुकल्या आवाजाचा शोध घेतला जात आहे. यासाठी ऑडिशन देखील सुरु झाल्या आहेत. जर तुमच्याकडे चिंटूचा आवाज असेल किंवा असा आवाज तुम्हाला माहित असेल तर, जाणून घ्या काय आहे ऑडिशनची प्रक्रिया…

ऑडिशनसाठी स्क्रिप्ट :

त्या दिवशी मला गणिताच्या पेपरचं जरा टेन्शन आलं होतं, ते मी आई पप्पांना सांगितलं तर ते म्हणाले, “एवढासा तर आहेस तू चिंटू, तुला कसलं आलंय टेन्शन!” आता यांना कसं समजावू मी, की किती टेन्शन्स असतात मला! मोठी माणसं अभ्यास कर, अभ्यास कर म्हणून सतत मागे लागलेली असतात त्याचं टेन्शन! आईनी अचानक डब्यात पडवळाची भाजी दिली तर काय, याचं टेन्शन! मिनीनं तिची एखादी कविता ऐकवली तर काय, याचं टेन्शन! जोशीकाकूंच्या बागेतल्या कैऱ्या पळवण्याचं टेन्शन, नव्या खेळण्यासाठी पप्पांकडे हट्ट करण्याचं टेन्शन, राजूशी सतत होणाऱ्या भांडणांचं टेन्शन! परीक्षेचं, अभ्यासाचं, याचं, त्याचं…किती किती टेन्शन्स! बापरे! आणि म्हणे लहान मुलांना टेन्शन्स नसतात!

आम्हा लहान मुलांची मोठीमोठी टेन्शन्स मोठ्यांना कशी कळणार! जाऊदे, आता मीही याचा विचार करायचा सोडूनच देतो! त्यापेक्षा पप्पांकडे नवीन खेळणं कोणतं मागायचं याचा विचार करतो…idea! सतीश दादाच्या बाईक सारखी खेळण्यातली बाईक मला हवीच आहे किती दिवसांपासून. आता संध्याकाळी पप्पा आले की त्यांना सांगतोच! अरे बापरे, समोरून मिनी येतेय आणि तिच्या हातात कसलातरी कागद दिसतोय…नक्की कविता असणार! मी पळतोSSS”( Snovel Creation searching voice for Chintoo character know the audition process)

ऑडिशन देऊ इच्छिणाऱ्या मुलांनी हा संवाद आपल्या आवाजात रेकॉर्ड करायचा आहे आणि काही नियम-अटी पाळून तो ऑडीओ परीक्षकांना पाठवायचा आहे.

पाहा पोस्ट :

*शोध चिंटूच्या आवाजाचा*

*चिंटूचे ऑडिशन स्क्रिप्ट* :

“त्या दिवशी मला गणिताच्या पेपरचं जरा टेन्शन आलं होतं, ते मी आई…

Posted by Chintoo on Tuesday, 4 May 2021

नियम, अटी आणि प्रक्रिया

चिंटूला आवाज देण्यासाठी तुम्हाला तुमची ऑडिशन ऑडिओ फाईल केवळ mp3 प्रकारात https://snovel.in/audition  वर शुक्रवार (21 मे) रात्री 11:59 पर्यंत अपलोड करायाची आहे. त्यात ‘Project Name – Chintoo’ असे लिहायचे आहे. या संबंधित आणखी अधिक माहितीसाठी हवी असल्यास तुम्ही sound@snovel.in वर संपर्क साधू शकता. स्नोवेलच्या वतीने चित्रकार चारुहास पंडित, लेखक श्रीरंग गोडबोले आणि अभिनेत्री स्पृहा जोशी याचे परीक्षण करणार आहेत.

या ऑडिशनसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. 8 ते 10 वर्षे वयोगटातल्या मुलांच्या आवाजातील ऑडिशन पाठवावी. 1-2 वर्षे पुढे-मागे असले तरी चालेल. महत्त्वाचे म्हणजे 21 मे नंतर कोणतीही ऑडिशन स्वीकारली जाणार नाही. तसेच, ऑडिशन फाईल ई-मेलवर स्वीकारली जाणार नाही. तेव्हा लगेच तयार व्हा आणि आपल्या ऑडिशन पाठवा.

(Snovel Creation searching voice for Chintoo character know the audition process)

हेही वाचा :

नितीन देसाईंच्या ND स्टुडिओत भीषण आग, ‘जोधा अकबर’च्या किल्ल्याचा सेट भक्ष्यस्थानी

‘T Series’चे मालक बनण्यापूर्वी ज्यूसच्या दुकानात काम करायचे गुलशन कुमार, गोळ्या मारून झाली होती हत्या!