मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan)बर्याचदा चर्चेत राहतो. मग, त्यामागचे कारण म्हणजे त्याचे चित्रपट, त्याच्या मैत्रिणी किंवा त्याचा दिलदार स्वभाव. सलमान खानच्या गर्लफ्रेंडची यादी तशी खूप लांब लचक आहे. तथापि, जेव्हा जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलले जाते, तेव्हा निश्चितपणे एक नाव समोर येते आणि ते आहे अभिनेत्री सोमी अली. सोमी अली (Somy Ali) परदेशातून भारतात केवळ सलमान खानशी लग्न करण्यासाठी आली होती. पण तिचे हे स्वप्न अपूर्णच राहिले (Sohail khan share story behind Salman Khan break up).
सोमीने काही काळापूर्वी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, सलमान खानने तिची फसवणूक केली आहे, त्यामुळे तिने सलमानसोबतचे संबंध तोडले. दरम्यान, सोहेल खान (Sohail Khan) याचा एक जुना व्हिडीओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये तो सांगत आहेत की, सोमी अलीने सलमान खानला त्याच्यामुळे सोडले होते. हा जरासा मजेदार किस्सा आहे. मात्र, यात किती सत्य आहे, याची खात्री नाही.
एकदा सोहेल खान कलर्स टीव्हीच्या ‘एंटरटेनमेंट नाईट’ नावाच्या कॉमेडी शोमध्ये आला होता. या शोमध्ये सोहेलला त्याच्या लग्नाबद्दल विचारले गेले होते. त्याच्या लग्नाचा किस्सा सांगण्यापूर्वी, त्याने म्हटले की माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली, तेव्हाच सलमान खानची मैत्रीण त्याला सोडून गेली.
सोहेल म्हणाला, ‘मी नाव घेणार नाही, पण त्यावेळी सलमान भाई कुणालातरी डेट करत होते. तिने सलमान भाईला सोडले आणि संतापून निघून गेली. जाता जाता म्हणाली की, धाकटा भाऊ लग्न करत आहे आणि हा मोठा भाऊ करत लग्नाचं नावच घेत नाहीये.’ सोहेलचे हे बोलणे ऐकून असे वाटते की, तो सोमी अलीबद्दल बोलत आहे. सोहेलचे लग्न 1998 साली झाले होते आणि सोमी अलीने त्याचवेळी सलमान खानबरोबर ब्रेकअप केला होता.
पाहा व्हिडीओ :
(Sohail khan share story behind Salman Khan break up)
यानंतर सोहेलने आपल्या लग्नाबद्दल एक मजेदार किस्सा सांगितला. सोहेल म्हणाला की, ‘लग्नाआधी मी माझ्या पत्नीला प्रथम डेट करत होतो. चंकी पांडे यांच्या साखरपुढ्याच्या वेळी दिल्लीत आमची भेट झाली होती. मग आम्ही ठरवलं की, आता लग्न करावं. एक दिवस मध्यरात्री म्हणजे रात्री 3-4च्या सुमारास मी वडिलांना उठवलं आणि मला पाहून ते म्हणाले की, तू पुन्हा गाडी ठोकलीस? मी म्हणालो नाही असं काहीचं झालं नाहीय. सीमा येथे आली आहे आणि आम्हाला लग्न करायचे आहे. यावर ते म्हणाले, ठीक आहे!’
सोहेल पुढे नमूद करतो की, माझे दोन मित्र सकाळी-सकाळी मौलवीला आणायला गेले होते. मौलवी वांद्रेतील मशिदीकडे जात होते. त्यांना गाडीत बसवले आणि घरी घेऊन आले. मौलवीसाहेब आले तेव्हा त्यांना फार राग आला होता. मी आणि सीमा त्यांच्या समोर बसलो होतो. त्यावेळी माझे वडील त्यांच्या खोलीच्या बाहेर आले. त्यावेळी मौलवींनी वडिलांकडे पाहिले आणि म्हणाले की, फक्त तुमचा मुलगाच असे कृत्य करू शकतो. यावर वडील म्हणाले की, ठीक आहे ना मौलवी साहेब, जर त्यांना प्रेम झाले आहे तर आम्ही तरी काय करू?
यानंतर मौलवी म्हणाले की, ‘नाही, नाही मी त्याबद्दल बोलत नाही. आपल्या मित्रांनी 35 वर्षांपूर्वी देखील माझे अपहरण केले होते. आई आणि वडीलांच्या नात्याला माझ्या दोन्ही आजोबांचा विरोध असल्याचे, सोहेलने सांगितले. मग वडिलांच्या मित्रांनी देखील याच मौलवींना उचलून आणले होते. त्यावेळी ते खूप तरुण होते. या प्रसंगी त्यांना त्या सर्वांची आठवण झाली.
(Sohail khan share story behind Salman Khan break up)
Photo : गोपी बहूचा सुंदर अंदाज, देवोलीना भट्टाचार्यच्या फोटोंनी चाहत्यांना भुरळ
प्रियंकाने शेअर केलं निकसोबतच्या ‘यशस्वी’ लग्नाचं गुपित, अशा प्रकारे ठेवतात एकमेकांना आनंदी!#PriyankaChopra | #NickJonas | #Entertainment https://t.co/Bp0wtswp50
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2021