मुंबई : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यावा म्हणून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या दरम्यान अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) स्थलांतरित कामगारांच्या मदतीला धावून आला होता. त्यानंतर सोनूने मदतीची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येकाच्या हाकेला ओ देत, त्यांची मदत केली. सोनू सूदच्या या कामगिरीने त्याने सर्वसामान्यांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले. आता सोनू सूदच्या चाहत्याने त्याला ‘भारतरत्न’ पुरस्कार (Bharat Ratna Award) देण्यात यावा, अशी मागणी करत थेट पंतप्रधानांना टॅग करत ट्विट केले आहे. (Sonu sood fan appeal to PM modi to honour actor with bharat ratna award)
सोनू सूदच्या या चाहत्याचे नाव आहे सोमनाथ श्रीवास्तव. सोमनाथ यांनी ट्विट करत सोनू सूदचे (Sonu Sood) कौतुक केले आहे. याच ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत त्यांनी लिहिले की, ‘आदरणीय पंतप्रधान, कोरोना काळात सोनू सूदने गरीब मजूर, विद्यार्थी, शिवाय इतर प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत केली आणि करत आहे. तो देशाचा खरा ‘नायक’ असून, त्याला ‘भारतरत्न’ पुरस्काराने (Bharat Ratna award) गौरवण्यात यावे, अशी आम्हा सर्व देशवासियांची मागणी आहे.’
— sonu sood (@SonuSood) October 10, 2020
या ट्विटमध्ये सोमनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केले आहे. आपल्या चाहत्यांच्या या मागणीला सोनू सूदनेही प्रतिसाद दिला आहे. ‘हात जोडलेले’ इमोजी देत सोनूने सोमनाथचे ट्विट पुन्हा ट्विट केले आहे. सोनूच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी भारतरत्न मागण्याची ही पहिली वेळ नाही. गरिबांना वैद्यकीय मदत, आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. (Sonu sood fan appeal to PM modi to honour actor with bharat ratna award)
हरियाणाच्या मोरनी खेड्यातील मुले स्लो-इंटरनेटमुळे हैराण झाली होती. मोबाईल नेटवर्क नसल्याने त्यांना ऑनलाइन अभ्यास करता येत नव्हता. या गोष्टींची माहिती मिळताच सोनू सूदने (Sonu Sood) मित्र करण गिल्होत्रा याच्या मदतीने गावात एक मोबाईल टॉवर बसविला. ज्यामुळे आता तिथल्या मुलांना जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओद्वारे सोनूला या मुलांच्या समस्येबद्दल माहिती मिळाली होती. एका व्हायरल व्हिडिओमध्ये, गृहपाठ करण्यासाठी एक लहानगा मुलगा झाडाच्या फांदीवर बसून मोबाईल सिग्नल शोधत होता. या व्हिडीओ पोस्टमध्ये सोनू आणि करण यांना या टॅग केले गेले होते, त्यामुळेच हा व्हिडीओ सोनू सूदपर्यंत पोहोचला होता. (Sonu sood fan appeal to PM modi to honour actor with bharat ratna award)
‘मुले ही आपल्या देशाचे भविष्य असतात आणि त्यांना चांगल्या भविष्यासाठी बरोबरीची संधी मिळाली पाहिजे. मला असे वाटते की, अशा समस्यांमुळे कोणाच्याही यशाच्या मार्गात अडथळा येऊ नये. मुलांना ऑनलाईन अभ्यासात मदत करण्यासाठी मी दुर्गम गावात मोबाईल टॉवर उभारला आहे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आता मोबाइल सिग्नलसाठी मुलांना झाडाच्या फांद्यावर बसण्याची गरज नाही’, असे म्हणत सोनू सूदने त्यांनाही मदत केली होती.
BIG hug mere bhai. ? @imkaurtoon @Karan_Gilhotra https://t.co/pt2u5VJfxb
— sonu sood (@SonuSood) October 9, 2020
या आधी सोनू सूदने चंदीगडमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सहभागी होण्यासाठी स्मार्टफोनचे वितरणही केले होते. दरम्यान, सोनू सूदच्या या कार्याची दाखल संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली आहे. महामारी काळात समाजकार्य केल्याबद्दल सोनू सूदला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमात (यूएनडीपी) विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(Sonu sood fan appeal to PM modi to honour actor with bharat ratna award)
संबंधित बातम्या :
Sonu Sood | कठीण काळात माणुसकीचे दर्शन, सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान
बैलांच्या जागेवर मुलींना जुंपून शेत नांगरलं, सोनू सूदकडून शेतकऱ्याला घरपोच ट्रॅक्टर
Sonu Sood | ऑनलाईन अभ्यासासाठी ‘झाडावरची कसरत’, मोबाईल टॉवरसाठी सोनू सूदची मदत!