काही सेलिब्रेटींची कामापेक्षा त्यांच्या खाजगी आयुष्याची चर्चा जास्त असते. आणि काहींची तर अगदीच वादग्रस्त आयुष्य असल्याचे देखील दिसतं. अशाच एका अभिनेत्याचे आयुष्य चांगलेच चर्चेत राहिलं आहे. या अभिनेत्याने 4 लग्न केली आहेत.ज्यातील 3 लग्न अयशस्वी राहिले असून त्याने 4 थे लग्न केलं आहे. एवढच नाही तर त्याच्या वर पहिल्या बायकोचा घरगुती हिंसाचाराचा आरोपही आहे.
खाजगी आयुष्य वादग्रस्त
हा प्रसिद्ध साउथ अभिनेता आहे बाला. बाला याचे खाजगी आयुष्य हे फारच चर्चेत राहिलेलं आहे. अभिनेत्याने त्याच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान असलेल्या भाजीसोबच लग्न केलं आहे आणि लग्नाच्या दीड महिन्यानंतर ती मुलाची आई होणार आहे. यामुळे आता लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना, अभिनेत्याने त्याच्या भाचीसोबतच्या त्याच्या प्रेमाची कहाणी सांगितली.
समाजाच्या विरोधात जाऊन भाचीशी लग्न
साउथ अभिनेता बालाला भाची कोकिलासोबत समाजाच्या विरोधात जाऊन लग्न केले. बालाचे पहिले लग्न गायिका अमृता सुरेशसोबत झाले होते,2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी डॉक्टर एलिझाबेथसोबत त्याचे लग्न झाले काही काळानंतर हे दोघेही विभक्त झाले.
एवढच नाही तर बालाने हे देखील सांगितले की त्याने 21 व्या वर्षी चंदना नावाच्या मुलीशी गुपचूप लग्न केले होते, परंतु कुटुंबाने त्यांना वेगळे केले होते. अखेर आता त्याचं कोकिलासोबतचे हे चौथे लग्न आहे. आणि हे लग्न आता शेवटचे असल्याचेही त्याने म्हटलं.
3 घटस्फोट अन् घरगुती हिंसाचाराचा आरोप
दरम्यान बाला कायदेशीरदृष्ट्या कोकिलाला त्याची दुसरी पत्नी मानतो तर, एलिझाबेथसोबतचा लग्नाचा दावाही त्याने फेटाळला आहे. तसेच त्याच्या पहिल्या पत्नीने अमृता सुरेशने त्याच्यावर शोषणाचा आरोप करून गुन्हा दाखल केला होता. या अभिनेत्याला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटकही करण्यात आली होती.
तसेच अभिनेता बालाने अमृताला आपल्या मुलीला भेटू देत नसल्याचा आरोपही केला होता. जामिनावर सुटल्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस अभिनेत्याने कोकिलासोबत लग्न केले.
दोघांनाही एकमेकांवर प्रचंड प्रेम असल्याचे कबूल केले आहे, त्यामुळे त्यांना समाजाच्या विरोधात जाऊन लग्न केल्याचंही म्हटलं आहे. बालाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता शेवटचा ‘बॅड बॉईज’ चित्रपटात दिसला होता. आणि आता समोर आलेल्या त्याच्या खाजगी आयुष्याबद्दलची चर्चा पाहून तो खऱ्या आयुष्यातही ‘बॅड बॉय’ असल्याचे म्हटले आहे.