जगमगाटी दुनियेत वावरणारे कलाकार त्याच्या खासगी आयुष्यात अनेकदा सर्वसामान्य लोकांप्रमाणेच जगताना दिसतात. बॉलिवूडमधील(Bollywood) अनेक कलाकार (celebrity)आपल्या आयुष्यात अध्यात्मिक गुरूंना (spiritual gurus), अध्यात्माला महत्त्वाचे स्थान देताना दिसून आले आहे. अनेकदा त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेताना, चांगले कार्य करताना अध्यात्मिक गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो. त्यांचे स्मरण केले जाते. आपल्या गुरूविषयी सार्वजनिकरित्या उघडपणे कबुलीही अनेक कलाकारांनी दिली आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय ओळखली जाते. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन ही सत्य साईबाबांची खूप मोठी भक्त आहे. सत्य साईंच्या मृत्यूनंतर ऐश्वर्या खूप दुःखी झाली होती.
ती अनेकदा त्यांच्या दर्शनाला गेल्याचेही दिसून आले होते. मीडिया रिपोर्टनुसार ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक मोठा निर्णय सत्यसाईंच्या सल्ल्यानंतरच घेत असे. यामध्ये बच्चन कुटुंबात सून म्हणून जाण्याचा निर्णयही सत्य साईबाबा यांच्या सल्ल्यानंतरच घेतला असल्यासाचे रिपोर्ट्स सांगतात.
बॉलिवूडमध्ये आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वासाठी अभिनेता संजय दत्त ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये संजू बाबा म्हणून प्रसिद्ध असलेला संजय दत्तही अध्यात्मिक गुरूला फॉलो करतो. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रमुख आध्यात्मिक गुरू रविशंकर यांना तो फॉलो करतो.
अनेकदा श्री श्री रविशंकर यांना त्यांच्या आश्रमात भेट देतो. एकदा संजू बाबाला या भेटीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्याने ही खासगी बैठक असल्याचे सांगत चर्चा करणे टाळले होते.
बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेस व सौंदर्यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी ओळखली जाते. शिल्पा शेट्टीचा वननेस युनिव्हर्सिटीचे आचार्य भगवान आणि अम्मा यांच्यावर विश्वास आहे.
एका पुस्तक प्रकाशन समारंभात शिल्पा म्हणाली, “मी जेव्हापासून वननेस युनिव्हर्सिटीमध्ये जायला सुरुवात केली, तेव्हापासून माझ्या आयुष्यावर सकारात्मक बदल घडला आहे. आम्हाला भगवान आचार्य, अम्मा आणि नमनजी यांचे आशीर्वाद मिळाले, केवळ मीच नाही तर माझे संपूर्ण कुटुंब भाग्यवान आहे.असेही टी म्हणाली होती.
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याचे संपूर्ण कुटुंब गुरु राधा स्वामी सत्संग व्यास यांचे भक्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधास्वामींच्या सत्संगात शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतला शाहिदचे वडील पंकज कपूर यांनी पसंत केले होते.
वास्तविक, मीराच्या कुटुंबाचाही राधास्वामी गुरूंवर विश्वास आहे. त्यांच्या लग्नाच्या वेळी सत्संगाचे प्रमुखही उपस्थित होते.