अवघ्या 21 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीने दोन दिव्यांग मुलांना घेतलं दत्तक; ‘पुष्पा 2’ मध्येही झळकली, इंडस्ट्रीतील आहे मोठं नाव

| Updated on: Dec 04, 2024 | 8:07 PM

'पुष्पा 2' मध्ये झळकलेल्या एका अभिनेत्रीने अवघ्या 21 वर्षी 2 दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं आहे. एवढचं नाही तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक आणि चर्चा असते.

अवघ्या 21 व्या वर्षी या अभिनेत्रीने दोन दिव्यांग मुलांना घेतलं दत्तक; पुष्पा 2 मध्येही झळकली, इंडस्ट्रीतील आहे मोठं नाव
Follow us on

‘पुष्पा 2’ ची आतुरता सर्वांनाच लागून राहिली आहे. उद्या म्हणजे 5 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जून, रश्मिका मंदाना किंवा पुष्पाचे डायलॉग सर्वच फेमस झालं आहे. पण या चित्रपटातील अजून एक अभिनेत्री फेमस झाली आहे. तिच्याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

ही अभिनेत्री आहे श्रीलीला. सध्या श्रीलाला ‘पुष्पा 2: द रुल’ मधील ‘किसिक’ गाण्यामुळे चर्चेत आहे. गेल्या 2 वर्षांत, तिने तीन मेगाबजेट पॅन इंडिया चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. मात्र, हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. पण तिच्या कामामुळे आणि अभिनयामुळे तिचे कौतुक अजूनही होत आहे.’पुष्पा 2′ मध्ये ती अल्लू अर्जुनसोबत आयटम सॉंग करताना दिसणार आहे.

200 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला श्रीलीलाचा महेश बाबूंसोबतचा चित्रपट ‘गुंटूर करम’ पॅन इंडियाचा होता. मात्र तोही जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. या चित्रपटाने केवळ 150 कोटी रुपये जमवले होते.

श्रीलीलाने यापूर्वी तमिळ सुपरस्टार नंदामुरी बालकृष्णासोबत 2023 मध्ये ‘भगवान केसरी’मध्ये काम केले होते, ज्यांना NBK म्हणूनही ओळखले जाते. 130 कोटी रुपयांत बनलेला हा पॅन इंडिया चित्रपटही 100 कोटी रुपयांची कमाई करू शकला आणि फ्लॉप झाला.

श्रीलीला सध्या 23 वर्षांची आहे. पण अवघ्या 21 व्या वर्षी ती दोन मुलांची आई झाली. कारण एका रिपोर्टनुसार श्रीलीलाने 2022 मध्ये एका अनाथाश्रमाला भेट दिली होती. तेथील दोन मुलांची अवस्था पाहून ती भावूक झाली आणि 18 फेब्रुवारी 2022 रोजी तिने दोन दिव्यांग मुलांना आयुष्यभरासाठी दत्तक घेतले.

श्रीलीलाचा जन्म 14 जून 2001 रोजी अमेरिकेतील मिशिगन येथे झाला. तिची आई स्वर्णलता बंगळुरूमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. श्रीलीला बालपणी भरतनाट्यम शिकली आहे तसेच तिला देखील आईप्रमाणेच डॉक्टर व्हायचे होते. 2021 मध्ये ती एमबीबीएसच्या अंतिम ती वर्षात होती.

मात्र, तिने आपले शिक्षण पूर्ण केले की नाही, याची माहिती अद्याप पक्की मिळालेली नाही. पण सध्या श्रीलीला हे चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे आणि तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक आणि चर्चा असते एवढं नक्की.