मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या परफेक्शनसाठी ओळखला जातो. गेल्या वर्षी आलेल्या ‘लाल सिंग चढ्ढा'(Lal Singh Chadha) मध्ये तो शेवटचा दिसला होता. या चित्रपटात त्याची भूमिका खूप वेगळी होती पण बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट काही त्याची जादू चालवू शकला नाही.
बहुतांश लोकांना या चित्रपटातील आमिरची भूमिका आणि त्याचा अभिनय, दोन्ही आवडले नाही. RRR फेम, प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली ( SS Rajamouli) यांनीही हा चित्रपट पाहून आमिरच्या अभिनयावर टिपण्णी केली होती. या चित्रपटात आमिरने ओव्हर ॲक्टिंग केली असे मत त्यांनी मांडले.
आमिर खानचा चुलतभाऊ आणि दिग्दर्शक मन्सूर खानने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे. राजामौली आमिरच्या अभिनयाबाबत जे बोलले होते, तेच मी देखील त्याला सांगितलं होतं, असं मन्सूर खान म्हणाले.
आमिरचा सेन्स ऑफ ह्यूमर खूप चांगला आहे. त्याने एकदा हसत-हसत मला सांगितलं की तू मला सांगितलंस की ही खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तू एक समजूतदार व्यक्ती आहे, त्यामुळे तुला असं वाटलं असेल. पण पुढे आमिर म्हणाला की, ‘ मात्र दिग्दर्शक राजामौली यांनीही जेव्हा मला सांगितलं की (चित्रपटात) ओव्हर ॲक्टिंग वाटत आहे, तेव्हा मी विचार केला, यांनापण असंच वाटत असेल तर मी खरंच तसं ( ओव्हर ॲक्टिंग) केलं असेल’. त्याने ते मान्य केलं.
मन्सूर खान म्हणाले की मी आमिरला योग्य रिव्ह्यू दिला होता. ते म्हणाले ती मला (चित्रपटाची) स्क्रिप्ट खूपच आवडली होती. चित्रपटाचा लेखक अतुल कुलकर्णी याने छान काम केलं. पण त्यांनाही असं वाटलं की आमिरची ॲक्टिंग थोडी जास्त झाली.
माझं म्हणणं असं होतं की ‘ चित्रपटातील हे कॅरेक्टर काही मूर्ख नाही. त्याला डिस्लेक्सिया किंवा इतर काही आजार नाहीये. तो फक्त थोडा अजब आहे…. पण फक्त तेवढंच ! फॉरेस्ट गंपमध्ये मला टॉम हँक्सचं काम खूप आवडलं होतं. त्यांचे हावभाव आणि एकंदर भूमिकाच त्यांनी उत्तम केली होती. मी हे आमिरलाही बोललो होतो, ‘ असं मन्सूर म्हणाले.
लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने काही काळ चित्रपटातून ब्रेक घेतला आहे. त्याचा लूकही बराच बदलला आहे.