मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हीच्या मागच्या अडचणी आता पुन्हा एकदा वाढणार आहेत. रियाच्या जामिनाविरूद्ध एनसीबीने (NCB) आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात उघडकीस आलेल्या ड्रग्ज केसमध्ये (SSR Drugs Case) रियाला जामीन देण्याच्या मुंबई कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सोमवारी एनसीबीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी 18 मार्च रोजी सुनावणी होणार आहे (SSR Drugs Case Update NCB files petition in supreme court against Rhea Chakraborty bail).
Supreme Court’s CJI bench, to hear on March 18, an appeal filed by the Narcotics Control Bureau (NCB) challenging the order of Bombay High Court granting bail to actor Rhea Chakraborty in an alleged drug case.
— ANI (@ANI) March 15, 2021
एनसीबीने अलीकडेच 12 हजार पृष्ठांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये रिया चक्रवर्ती हिचेही नाव आहे. सेंट्रल एजन्सीने आपल्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती आणि अन्य 32 जणांवर बेकायदेशीर ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. हे एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 ए अंतर्गत येते आणि यानुसार किमान 10 वर्ष, तर जास्तीत जास्त 20 वर्षांच्या तुरूंगवासाची तरतूद आहे.
केंद्रीय एजन्सीनुसार रियाने कबूल केले आहे की, ती घरात ड्रग्ज आणत होती. नोव्हेंबर 2019मध्ये याची सुरुवात झाली. एवढेच नव्हे तर रियाने यापूर्वी शोविककडे ड्रग्ससाठी पैसेही हस्तांतरित केले होते. ज्यामुळे आता एजन्सीने रियावर ड्रग्स खरेदी आणि ड्रग्ज पुरवठा केल्याचा आरोप केला आहे.
रियाने असेही सांगितले आहे की, सुशांतला गांजा आणि मारिजुआना देण्यात आला होता. आरोपपत्रात असेही लिहिले आहे की, रिया व्यतिरिक्त तिचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि हृषीकेश पवार हे सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्ज खरेदी व पुरवठा करत असत. या क्षणी यापैकी काही आरोपी जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणात अद्याप तपास चालू आहे.
तपासादरम्यान, मेंदूच्या मज्जातंतूंच्या पेशींच्या असामान्य आणि जास्त क्रियाकलाप नियंत्रित करण्यासाठी असलेले अॅल्प्रझोलम आणि क्लोनाझेपॅम यासह चरस, गांजा, एलएसडी, एक्स्टसी हे ड्रग्ज आढळले आहेत. हे सर्व एनडीपीएस अधिनियम कलम 20 (बी), 22, 23 अन्वये जप्त केले आहेत. याशिवाय मोठ्याप्रमाणात भारतीय व विदेशी चलनेही हस्तगत केली आहेत (SSR Drugs Case Update NCB files petition in supreme court against Rhea Chakraborty bail).
रिया चक्रवर्ती यांचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले की, एनसीबीने रिया चक्रवर्ती यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. संपूर्ण एनसीबी बॉलिवूडच्या ड्रग प्रकरणाचा खुलासा करण्यात मग्न आहे. चार्जशीट निरुपयोगी आहे, जी एनडीपीएस अधिनियम कलमांतर्गत नोंदवलेले अयोग्य पुरावे आणि विधानांच्या आधारे उभी राहिली आहे. तुफानी सिंग यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही ती अनावश्यक आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील त्यांच्या घरी मृतावस्थेत सापडला होता. सीबीआय अद्याप या प्रकरणाची चौकशी करत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आल्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्ती, तिचाचा भाऊ शोविक यासह अनेक ड्रग पेडलर्सना अटक केली. एनसीबीने या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंग यांचीही चौकशी केली आहे.
(SSR Drugs Case Update NCB files petition in supreme court against Rhea Chakraborty bail)