Timeless | थोडक्यात हुकला व्ही. शांतारामांचा प्रयत्न, अन्यथा ‘हा’ ठरला असता पहिला रंगीत चित्रपट!

| Updated on: May 18, 2021 | 10:33 AM

1913मध्ये 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट रिलीज झाला, तेव्हा लोकांनी तो खूप आनंदाने पाहिला. हा पहिला भारतीय चित्रपट होता,त्यामुळे लोकांनी तो उत्साहाने पहिला.

Timeless | थोडक्यात हुकला व्ही. शांतारामांचा प्रयत्न, अन्यथा ‘हा’ ठरला असता पहिला रंगीत चित्रपट!
किसान कन्या
Follow us on

मुंबई : आपल्या जीवनात रंग ज्याप्रकारे महत्वाची भूमिका बजावतात, त्याचप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील रंग महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रंगहीन जीवन असो वा चित्रपट, फारच कमी लोकांना ते पाहायला आवडेल. सिनेमात रंग किती महत्वाचे आहेत हे, समजण्यासाठी आपल्याला थोडेसे फ्लॅशबॅकमध्ये जावे लागेल. 1913मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट रिलीज झाला, तेव्हा लोकांनी तो खूप आनंदाने पाहिला. हा पहिला भारतीय चित्रपट होता,त्यामुळे लोकांनी तो उत्साहाने पहिला. त्यानंतर तो चित्रपट आला ज्याने, चित्रपटांना आवाज दिला म्हणजेच भारताचा पहिला बोलका चित्रपट बनवला. 1931मध्ये ‘आलम आरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता (Story of first Indian Colour film in indian cinema history).

हे सर्व चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तयार झाले होते. हा काळ होता जेव्हा लोक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट अत्यंत उत्सुकतेने पहायचे. तथापि, त्या काळातल्या चित्रपट निर्मात्यांना ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातही रंगासाठी ग्रे शेड्स कसे वापरायचे, हे चांगले माहित होते. त्या चित्रपटांमध्ये ग्रे शेड्स चमकदारपणे वापरला जात असे. त्याचवेळी असे वर्षही आले, जेव्हा सिनेमाला रंग देण्याचा प्रयत्न केला जात होता.

भारताचा पहिला रंगीत चित्रपट कोणता?

सायलेंट आणि टॉकी चित्रपटानंतर तो काळ आला, जेव्हा भारताचा पहिला रंगीत चित्रपट तयार झाला. तुम्हाला माहिती आहे का भारताचा पहिला रंगीत चित्रपट कोणता होता? 1937मध्ये मोती गिडवाणी यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला. ‘किसन कन्या’ असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटाद्वारे भारतीय सिनेमाला रंग प्राप्त झाला आणि अर्देशिर इराणी निर्मित हा चित्रपट भारताच्या इतिहासातील पहिला रंगीत चित्रपट ठरला.

थोडक्यात हुकली व्ही. शांताराम यांची संधी

तथापि, प्रख्यात चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या चित्रपटाच्या ‘सौरंध्री’ चित्रपटास रंग देण्यात काही अडचण आली नसती, तर आज हा चित्रपट भारताचा पहिला रंगीत चित्रपट ठरला असता. खरं तर, व्ही. शांताराम यांनी 1933 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सौरंध्री’ चित्रपटाला रंग देण्यासाठी अनेक जोखीम पत्करल्या आणि ते जर्मनीतही गेले. परंतु, त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि चित्रपटाला रंग येण्याची कल्पना अयशस्वी झाली. व्ही. शांताराम हा इतिहास रचण्याचा प्रयत्न हुकला (Story of first Indian Colour film in indian cinema history).

‘किसान कन्या’च्या माध्यमातून सआदत हसन मंटो इंडस्ट्रीत आले!

यानंतर ‘किसान कन्या’ चित्रपटाची निर्मिती झाली. या चित्रपटाचे नाव इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवले गेले. हा केवळ भारताचा पहिला रंगीबेरंगी चित्रपटच नाही, तर त्यात एक इतिहास जोडला गेला आहे. प्रख्यात लेखक सआदत हसन मंटो यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. असं म्हणतात की या चित्रपटाच्या माध्यमातून सआदत हसन मंटो मनोरंजन विश्वात दाखल झाले. त्यांनी या चित्रपटाची केवळ कथा लिहिली नाही तर, चित्रपटाचे संवादही लिहिले.

या चित्रपटाच्या कथेतून त्यांनी लिहिलेल्या त्या काळातील सामाजिक-राजकीय गोष्टी प्रतिबिंबित झाल्या. या चित्रपटाची कहाणी देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या शेतकऱ्यांच्या दुर्दशेभोवती फिरत होती. जमीनदारांनी शेतकर्‍यांशी कसा गैरव्यवहार केला, हे अत्यंत सहजतेने आणि सौंदर्याने चित्रित केले गेले. भारतातील शेतकर्‍यांचे संकट हा दीर्घ काळापासून एक मुद्दा आहे. भारत हा एक असा देश आहे, जो बर्‍याच काळ दुष्काळाशी संघर्ष करत होता. आजही शेतकर्‍यांची समस्या प्रासंगिक आहे. मात्र, या चित्रपटाने भारतीय मनोरंजन विश्वासाठी नवे दार खुले केले.

(Story of first Indian Colour film in indian cinema history)

हेही वाचा :

Photo : दिव्यांका त्रिपाठीची केपटाऊनमध्ये धमाल, सोशल मीडियावर फोटो शेअर

Miss Universe 2020 : तोतरेपणा, शरीरावर डाग, तरीही अ‍ॅडलिन कॅस्टेलिनो अशी पोहोचली ‘मिस युनिव्हर्स’पर्यंत