नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : ‘गदर 2’ (Gadar 2) च्या माध्यमातून सनी देओल (sunny deol) और अमीषा पटेल (ameesha patel) यांचे 22 वर्षांनी पुन्हा एकत्र मोठ्या पडद्यावर पुनरागमन झाले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर बंपर कमाई केली असून अजूनही चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे. चित्रपटाल मोठे यश मिळत असून अनेक सेलिब्रिटींनीही त्याचे बरेच कौतुक केले आहे. त्याचदरम्यान चित्रपटासाठी आणखी एक खुशखबर आहे. नव्या संसदगृहात गदर 2 चे स्क्रीनिंग होणार असून यामुळे निर्मात्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीच ही गुड न्यूज शेअर केली आहे.
दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सर्वांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. “ नव्या संसदेच्या, बालयोगी सभागृहात गदर 2 च्या प्रदर्शनाबाबत ईमेल मिळाल्याने एएसपी (अनिल शर्मा फिल्म्स) खूप खुश आहे. हे स्क्रीनिंग आजपासून ( 25 ऑगस्ट) सुरू होत असून तीन दिवस चालणार आहे. खासदार, उपराष्ट्रपती आणि इतर सदस्यांसाठी हे स्क्रीनिंग केले जात आगे. गदरच्या टीमसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.” अशा शब्दांत अनिल शर्मा यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ASP is thrilled to get an email about screening #gadar2 in the new Parliament building at Balayogi auditorium for three days beginning today (August 25), for members n vice president .. n others
What an honour for Team #gadar2 🙏😊 pic.twitter.com/RUn0PzK024— Anil Sharma (@Anilsharma_dir) August 25, 2023
या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गदर 2 हा दिवसेंदिवस यशाचे नवे मानदंड रचत असून त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच पहावासा वाटत आहे. सनी देओल हा खासदार आहे, त्यामुळे त्याने चित्रपटात कसं काम केलं आहे, हे पाहण्यासाठी त्याचे सहकारी देखील उत्सुक आहेत. रिपोर्टनुसार पहिल्या दिवशी चित्रपटाचे पाच शो होणार आहेत. लोकसभा आणि नवीन संसदेत चित्रपट दाखवला जाण्याची ही पहिलीच घटना असून ती ऐतिहासिक आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
गदर 2 ने केली बंपर कमाई
सनी देओलच्या गदर 2 ने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच 400 कोटींचा टप्पा ओलांडला असून अजूनही त्याची घोडदौड थांबलेली नाही. विशेष म्हणजे सनी देओलचा गदर हा बॉलिवूडचा दुसरा चित्रपट आहे, ज्याने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा जादुई आकडा गाठला. पहिल्या क्रमांकावर शाहरुख खानचा पठाण चित्रपट असून त्याने , ज्याने 543 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला.