Sushmita Sen | ‘त्या’ एका सवयीमुळे सुष्मिता समजली जायची ॲटीट्युड गर्ल, मेकर्स, अभिनेत्यांनाही व्हायचा त्रास

| Updated on: Aug 21, 2023 | 12:17 PM

चित्रपटसृष्टीतील सुरूवातीच्या दिवसांमध्ये मला ॲटीट्युड गर्ल असा टॅग मिळाला होता, असा खुलासा अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकताच केला आहे. तिच्या एका सवयीमुळे तिला हे नाव मिळाले होते.

Sushmita Sen | त्या एका सवयीमुळे सुष्मिता समजली जायची ॲटीट्युड गर्ल, मेकर्स, अभिनेत्यांनाही व्हायचा त्रास
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई | 21ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सुष्मिता सेन (SushmitaSen) सध्या तिच्या ‘ताली’ (Taali) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये ती एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसली आहे. तिने यामध्ये ट्रान्सजेंडर ॲक्टीव्हिस्ट गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजचे आणि सुष्मिताच्या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे. बॉलिवूडमधीस अनेक कलाकारांनीही सुष्मिताचे भरभरून कौतुक केले आहे.

याचदरम्यान सुष्मिताने एक मोठा खुलासा केला आहे. बॉलिवूडमधील सुरूवातीच्या दिवसांत सेट वेळेवर सोडण्याच्या सवयीमुळे मेकर्सना त्रास व्हायचा, असे वक्तव्य तिने केले आहे. एका मुलाखतीदरम्यान सुष्मिताने बॉलिवूडमधील तिच्या सुरूवातीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘ तुम्ही जर मेजर ए-लिस्ट अभिनेत्यांपैकी असलेल्या एखाद्या खान सोबत चित्रपट करत असाल तर तुम्ही शिफ्ट, वेळ आणि (शूटिंगसाठी लागणारे) दिवस याबद्दल कधीच बोलू नका. सरळ मागे वळा आणि पुक्चर पूर्ण करा’ असे सुष्मिता म्हणाली.

वेळेवर सेट सोडण्याच्या सवयीमुळे मिळाला ॲटीट्युड गर्लचा टॅग

शूटिंगची वेळ आली की सुष्मिता ही एक नीट, शेड्युल फॉलो करायची आणि ती आजही ठराविक तास काम करण्याची सवय फॉलो करते. मेकअप, हेअरस्टाइल यासह तिने ८ ते १० तासांची वेळ मागितली. ती वेळेवर कामावर यायची आणि वेळेवरच परत जायची, मात्र तिच्या सवयीमुळे अनेक जण हैराण व्हायचे. सगळ्यांना वाटायचं ही स्वत:ला काय समजते, ॲटीट्युड देते.पण तिने एका निर्मात्यासोबत तिच्या अटींनुसार काम केले, तेव्हा त्याला जाणवले की त्यामुळे प्रॉडक्शनच्या पैशांतही बचत होत होती.कारण सगळ काही वेळेनुसारच व्हायचं.

आँखे चित्रपटाच्या वेळीही ती वेळेवरच सेट सोडायची

त्यानंतर सुष्मिताने हेही सांगितलं की ती जेव्हा आँखे चित्रपटात,अमिताभ बच्चन, परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काम करत होती, तेव्हा देखील ती तिच्या शिफ्ट टायमिंगनुसार सेट सोडायची. कोणाला दुखावण्यासाठी नव्हे पण माझी वेळेची शिस्त पाळण्यासाठी मी हे करायचे, असे तिने नमूद केले.

ताली चे झाले कौतुक

सुष्मिता सेनने तिच्या वेब सीरिज ‘ताली’साठी खूप प्रशंसा मिळवली आहे. तिची ही मालिका जिओ सिनेमावर पाहता येईल.अभिनेत्री शिल्पा शेट्टी, सुष्मिताची वहिनी चारू असोपा, हिना खान, गौहर खान या अभिनेत्रींनी देखील तिचे खूप कौतुक केले आहे. सुष्मिता लवकरच आर्या 3 मध्ये पुन्हा दिसणार आहे.