मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) लवकरच आई होणार आहे. स्वराने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज शेअर केली आहे. तिने पती फहदसोबतचा बेबी बंप असलेला फोटो शेअर केला आहे.
स्वरा आणि समाजवादी पक्षाचा नेता फहद यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये नोंदणीकृत विवाह केला होता. त्यानंतर काही दिवसांनी या लग्नाचा सेलिब्रेशनही करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासूनच स्वराच्या प्रेगन्सींची चर्चा सुरू होती. मात्र तेव्हा स्वरा किंवा फहाद यांनी काहीच भाष्य केले नव्हते.
अखेर आज थोड्या वेळापूर्वी स्वराने ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज शेअर केली आहे. ‘ कधी कधी तुमच्या सर्व प्रार्थनेचे एकत्र उत्तर मिळते ! धन्य, कृतज्ञ, उत्साही (आणि अनाकलनीय!) या नव्या जगात पाऊल ठेवताना या सर्व भावना मनात दाटून आल्या आहेत !’ अशा आशयाची कॅप्शन लिहीत तिने प्रेग्नन्सीचा खुलासा केला आहे. ‘कमिंग सून’. ‘कुटुंब, ‘ऑक्टोबर बेबी’, असे हॅशटॅगही टाकत स्वराने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. यावरूनच स्वरा भास्करच्या बाळाचा जन्म ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचं समजतंय.
Sometimes all your prayers are answered all together! Blessed, grateful, excited (and clueless! ) as we step into a whole new world! ?❤️✨?? @FahadZirarAhmad #comingsoon #Family #Newarrival #gratitude #OctoberBaby pic.twitter.com/Zfa5atSGRk
— Swara Bhasker (@ReallySwara) June 6, 2023