मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूवर (Taapsee Pannu) आयकर विभागाने छापा टाकला आहे. असाच बॉलिवूडच्या अनेक कलाकारंवर छापा टाकण्यात आला आहे, ज्यातून सीबीडीटीने सुमारे 300 कोटींच्या हेराफेरीची माहिती शोधून काढली आहे. या प्रकरणात प्राप्तिकर विभाग आणखी वेगवेगळ्या 28 ठिकाणी तपास करत आहे. यात तापसी पन्नूच्या कमाई आणि संपत्तीचा विचार केला तर, तिच्याकडे एकूण 44 कोटींची मालमत्ता आहे. तापसीची कमाई चित्रपट, ब्रँड अॅन्डॉर्समेंट इत्यादींवर अवलंबून आहे. तापसी प्रत्येक चित्रपटासाठी 1 ते 2 कोटी रुपये मानधन आकारते (Taapsee Pannu Luxurious car collection and her income source).
तापसी 10 ब्रँड्सना प्रमोट करते, ज्यात गार्नियर कलर नॅचरल, मेलांज बाय लाइफस्टाईल, निविया, लायरा अशा काहीं मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. ती केवळ ब्रँड अॅन्डॉर्समेंटद्वारे वर्षाला सुमारे 2 कोटी रुपये कमावते. याशिवाय तापसी प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये खेळणाऱ्या ‘पुणे 7S’ या पुण्यातील बॅडमिंटन संघाची मालक आहे. यातून तापसी दरमहा 30 लाखाहून अधिक उत्पन्न मिळवते, तर त्याचे वार्षिक उत्पन्न 4 कोटींपेक्षा अधिक आहे.
जर, आपण तिच्याकडे असलेल्या गाड्यांविषयी चर्चा केली, तर तापसीकडे बीएमडब्ल्यू 5 सीरीज, मर्सिडीज एसयूव्ही आणि रेनॉल्ट कॅप्चर या गाड्या आहेत. बीएमडब्ल्यूची 5 सीरीज आता भारतात अधिकृतपणे विकली जात आहे आणि दिल्लीत या कारची किंमत 49.9 लाख रुपयांपासून होते. तर, या गाडीच्या टॉप मॉडेलसाठी किमान 61.3 लाख रुपये मोजावे लागतात.
तर, तापसीकडे असलेल्या जर्मन लक्झरी कार कंपनी मर्सिडीज-बेंझच्या एसयूव्हीबद्दल बोलायचे, तर या कारची शोरूम किंमत 52.56 लाख रुपयांपासून सुरू होते. पेट्रोल व्हेरिएंट जीएलसी 200ची किंमत 52.75 लाख रुपये आहे. त्याचबरोबर, या गाडीच्या डिझेल व्हेरिएंट जीएलसी 220 डीची किंमत 57.75 लाख रुपये इतकी आहे.
रेनो कॅप्चर या गाडीची एक्स-शोरूम किंमत 9.5 लाख रुपयांपासून सुरु होते, जी 13 लाख रुपयांपर्यंत जाते. त्याच वेळी, जर तुम्ही त्याचे टॉप व्हेरिएंट विचारत घेतले, त्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये मोजावे लागतील. ही गाडी 4 व्हेरिएंटमध्ये येते.
रिअल इस्टेटबद्दल बोलायचे तर, नुकतेच मुंबईच्या उपनगरातील अंधेरीमध्ये तापसीने दोन मोठे फ्लॅट्स खरेदी केले आहेत. त्यातील एकामध्ये सध्या ती राहत आहे. हा 3 बीएचके फ्लॅट आहे (Taapsee Pannu Luxurious car collection and her income source).
प्राप्तिकर विभागाच्या प्रवक्त्या सुरभी आलुवालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणी दरम्यान मोठ्या फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या घोषित उत्पन्नात आणि बॉक्स ऑफिसवर मिळणाऱ्या प्रत्यक्ष उत्पन्नात म्हणजेच कर चुकवण्यामध्ये महत्त्वपूर्ण फरक आढळला आहे. चौकशीदरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांना 300 कोटींच्या अघोषित उत्पन्नाबाबत कोणतेही योग्य उत्तर देता आले नाही.
तापसी पन्नूच्या नावावर 5 कोटी रुपयांची रिसिट रिकव्हर झाली. ज्याची तपासणी सुरु आहे. याशिवाय 20 कोटींच्या टॅक्सचोरीसंबंधी पुरावे मिळाले आहेत. असेच पुरावे तापसीविरोधातही मिळाल्याची माहिती समजत आहे. दोन टॅलेंट कंपन्या (फँटम आणि क्वान) यांच्याकडून मोठ्या रकमेचा डिजीटल डेटा व्हॉट्सअॅप, इमेल हार्ड डिस्कसह जप्त केले आहे. सर्च ऑपरेशन आणि चौकशी अजूनही सुरुच आहे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तापसीने दक्षिणेत बरेच चित्रपट केले आहेत. 2010मध्ये तिने ‘झुमंडी नादम’ या तेलुगु चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. 2013मध्ये ‘चश्मे बद्दूर’ या विनोदी चित्रपटातून तापसीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तापसीकडे सध्या बरीच वैयक्तिक गुंतवणूक देखील आहे, तर सध्या तिच्याकडे चित्रपटांची मोठी रांग आहे.
(Taapsee Pannu Luxurious car collection and her income source)
Income Tax Raid | ‘हे तर छोटे प्लेयर…’, इन्कमटॅक्स धाडीनंतर कंगनाचा अनुराग-तापसीवर हल्लाबोल!
अनुराग, तापसीच्या अडचणी वाढणार; दोन दिवसांपासून चौकशी सुरुच, मोठे खुलासे होण्याची शक्यता?
कंगनाशी पंगा, मोदी सरकारविरोधी भूमिका, तापसीच्या धाडीचं राजकीय कनेक्शन? किती कमाई? वाचा सविस्तर@taapsee | #taapseepannu | #Bollywood | #TaapseePannuNetWorth | #incometaxindia https://t.co/yAC5eeGrbg
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 3, 2021