Taapsee Pannu Wedding : पंजाबी गाण्यावर डान्स अन् रॉयल एण्ट्री; तापसी पन्नूच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर

| Updated on: Apr 04, 2024 | 8:50 AM

बॉलिवूडमध्ये तिच्या खणखणीत अभिनयामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री तापसू पन्नू गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाइफमुळे खूप चर्चेत आहे. तिने तिच्या परदेशी बॉयफ्रेंड, मॅथियसशी गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा सुरू होती. आता तिच्या या सिक्रेट लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून वेगाने व्हायरल होतोय.

Taapsee Pannu Wedding : पंजाबी गाण्यावर डान्स अन् रॉयल एण्ट्री; तापसी पन्नूच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर
तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडीओ अखेर समोर
Image Credit source: social media
Follow us on

बॉलिवूडमध्ये तिच्या खणखणीत अभिनयामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री तापसू पन्नू गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाइफमुळे खूप चर्चेत आहे. तिने तिच्या परदेशी बॉयफ्रेंड, मॅथियसशी गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा सुरू होती. बॉलिवूडमधील एक नामवंत दिग्दर्शक सोडला तर बाकी कोणालाच या लग्नाचे निमंत्रण नव्हते असेही वृत्त समोर आले होते. आता तिच्या या सिक्रेट लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून त्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तापसीने अखेर मॅथियस सोबत सात फेरे घेत ती लग्नबंधनात अडकल्याचं स्पष्ट झालं आहे.

23 मार्च रोजी तापसी आणि मॅथियसने गुपचूप लग्न केल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली असेही वृत्त समोर आले होते. आता तिच्या या सीक्रेट लग्नाचा व्हिडीओ अखेर समोर आलाच असून सध्या सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल होतोय. राजस्थानमधील उदयपूरमध्ये तापसी मॅथियसचा शानदार विवाहसोहळा पार पडला.

वधूची झोकात एंट्री

वरमाला विधीसाठी तापसीने पंजाबी गाण्यावर थाटात एंट्री केली. लाल रंगाचा भरजरी ड्रेस, हातात चुडा, डोळ्यांवर गॉगल अशा खास अंदाजात, मस्त नृत्य करत तापसी समोर आली. तर तिचा भावी पती मॅथियस हा क्रीम कलरची शेरवानी घालून, हसत तिची वाट पहात होता. त्यांच्या दोघांच्या लग्नाच्या हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेता विषय ठरला आहे. या सीक्रेट लग्नाच्या व्हिडीओने सर्व नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘कोठे ते आ माहिया’ या गाण्यावर थिरकत तापसीने लग्नासाठी एंट्री घेतली. नंतर समोर आलेल्या मॅथियसला तिने छान मिठी मारली. नंतर दोघांनी एकमेकांना वरमाल घातल्या आणि त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. तापसी पन्नू आणि मॅथियास यांनी पंजाबी रिती-रिवाजानुसार लग्न केलं

तापसी पन्नू आणि मॅथियास यांची पहिली भेट 2013 मधअये इंडियन बॅडमिंटन लीगच्या उद्घाटनादरम्यान झाली होती. दोघांनी कधी त्यांचं नातं अधिकृतरित्या जाहीर केलं नाही. तापसी पन्नूने अनेकदा मॅथियाससोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. लग्नानंतर तापसीने धुळवडीचा सण साजरा केला.

इथे पहा व्हिडीओ

 

 

बॉलिवूड सेलिब्रिटांना नव्हतं निमंत्रण

तापसी पन्नूच्या लग्नासाठी बॉलिवूडच्या कोणत्याही प्रसिद्ध सेलिब्रिटींना आमंत्रित केलं नव्हतं. अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील फक्त तिच्या जवळच्या मित्रांना, अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों या दोघांनाच निमंत्रण दिलं होतं. अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटांमध्ये तापसीने काम केलं होतं.

कशी झाली मॅथियसशी भेट

तापसी पन्नू आणि मॅथियास यांची पहिली भेट 2013 मधअये इंडियन बॅडमिंटन लीगच्या उद्घाटनादरम्यान झाली होती. दोघांनी कधी त्यांचं नातं अधिकृतरित्या जाहीर केलं नाही. तापसी पन्नूने अनेकदा मॅथियाससोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. लग्नानंतर तापसीने पतीसोबत होळी, धुळवड एकत्र साजरी केली.