‘तारक मेहता’मधील सोनू पुन्हा अडकली लग्नबंधनात, 2 महिन्यात दुसऱ्यांदा चढली बोहल्यावर

| Updated on: Mar 17, 2025 | 12:44 PM

Jheel Mehta Wedding: 'तारक मेहता' मालिकेतील झील आणि आदित्य यांनी रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं आहे. त्यासाठी त्यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.

तारक मेहतामधील सोनू पुन्हा अडकली लग्नबंधनात, 2 महिन्यात दुसऱ्यांदा चढली बोहल्यावर
Jheel Mehta
Image Credit source: Instagram
Follow us on

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पाहिली जाते. या मालिकेतील प्रत्येक कलाकारा हा चर्चेत असतो. आता मालिकेतील सोनू म्हणजेच झील मेहता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. झील मेहताच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी झीलने लग्नगाठ बांधली होती. आता पुन्हा एकदा ती विवाहबंधनात अडकली आहे.

झील मेहताने १७ फेब्रुवारी २०२५ रोजी ऑफिशियल लग्न केल्याचे सांगितले होते. अशातच फक्त दोनच महिन्यांत झीलनं पुन्हा एकदा लग्न केल्यामुळे चाहते चकीत झाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का झीलने तिचा नवरा आदित्य दुबेशीच दुसऱ्यांदा लग्न केले आहे. त्यांनी रजिस्टर पद्धतीने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. दोघांनीही या लग्नासाठी आयव्हरी रंगाचे आऊटफिट परिधान केले आहेत. तसेच काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हे लग्न केले आहे. लग्न करतानाचा व्हिडीओ झीलने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

हे सुद्धा वाचा

Video: घटस्फोटीत अभिनेता पडला प्रेमात, गर्लफ्रेंडला नको तिकडे रंगलावताना पाहून संतापले नेटकरी

रजिस्टर पद्धतीने केले लग्न

रजिस्टर पद्धतीने लग्न करताना झील आणि आदित्यने एकमेकांना हार घातले आहेत. झीलच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत झीलने, ‘शेवटी कायदेशीररित्या लग्न झालं. 17•02•25’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत झीलला शुभेच्छा दिल्या आहेत.

डिसेंबरमध्ये केले होते पहिले लग्न

झीलने गेल्या व डिसेंबर महिन्यात आदित्यसोबत मोठ्या थाटामाट लग्न केले होते. या लग्नाला दोघांचेही कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. त्यांच्या पहिल्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. झील आणि आदित्य या फोटोंमध्ये मजामस्ती करताना आनंदात दिसले. लग्नाच्या दिवशी, झीलनं लाल रंगाचा लेहेंगा वेअर केला होता, जो खूप सुंदर दिसत होता. त्यावर गोल्डन रंगाचे मणीकाम असलेले ब्लाईज आणि दुपट्ट घेतला होता. नववधूच्या लूकमध्ये झील अतिशय सुंदर दिसत होती.