मुंबई : छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये (Taarak Mehta Ka Ooolath Chashmah) अभिनेता म्हणून झळकलेल्या एका कलाकाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्याला चेन स्नॅचिंगच्या प्रकरणात पोलिसांनी पकडले आहे. मिराज (Miraj Kapadi) असे या अभिनेत्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. खरंतर क्रिकेट सट्टेबाजीच्या वाईट व्यसनामुळे हा अभिनेता कोट्यावधी रुपयांच्या कर्जात बुडला आणि मग ते कर्ज फेडण्यासाठी गुन्हेगारीच्या जगाताचा मार्ग त्याने अवलंबला (Taarak Mehta Ka Ooolath Chashmah fame actor Miraj Kapadi arrested in chain snatching case).
प्रसिद्ध वेब साईटच्या प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मिराज त्याच्या सट्टेबाजीच्या सवयीमुळे गुन्हेगार बनला आहे. क्रिकेट सट्टेबाजीत त्याने जवळपास 25 ते 30 लाख रुपये गमावल्यानंतर, त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने चेन स्नॅचिंग सुरू केले. रिकाम्या रस्त्यावर तो आपल्या मित्रांच्या मदतीने चेन स्नॅचिंग करायचा.
रांदेर भेसन चौकाजवळील परिसरातून मिराज वल्लभदास कापडी आणि त्याच्यासह त्याचा साथीदार वैभव बाबू जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही योजना रांदेर पोलिसांनी एका खबरीच्या माहितीवरुन तयार केली होती, जी यशस्वी झाली आहे. अटकेनंतर या दोघांकडून 3 सोनसाखळ्या, 2 मोबाईल व चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी वैभव जाधव आणि मिराज कापडी हे जुनागडचे रहिवासी आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, रिकाम्या रस्त्यावर हे दोघे वाटसरू महिलांना धाक दाखवून त्यांच्या साखळ्या खेचून तिथून पळ काढत असत. अटकेनंतर या दोघांनीही त्यांच्यावरील आरोप स्विकारले आहेत. वैभव आणि मिराजवर महिधरपुरा, उधना आणि रांदेर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत (Taarak Mehta Ka Ooolath Chashmah fame actor Miraj Kapadi arrested in chain snatching case).
पोलिसांनी अटक केल्यावर मिराजने आपण हे काम गेल्या अनेक वर्षांपासून करत असल्याची कबुली दिली आहे. उदरनिर्वाहासाठी मिराजने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘संयुक्ता’, ‘थपकी’, ‘मेरे अंगने मे’ सारख्या नामांकित हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. मात्र, पुरेसे काम मिळत नसल्याने आणि सट्ट्याचा नाद जडल्याने तो गुन्हेगारी विश्वाकडे वळला.
मिराजला क्रिकेटच्या नादात जुगार खेळण्याची सवय लागली होती. यामुळे अभिनयातून मिळणारे पैसे कमी पडू लागले होते. अशावेळी त्याने इतरांकडून पैसे उधार घेऊन जुगार खेळण्यास सुरुवात केली. मात्र, यात त्याला प्रचंड तोटा सहन करावा लागला. यानंतर लोकांकडून घेतलेले कर्ज परत न करता आल्यामुळे तो कर्जाच्या डोहात पुरता बुडाला आणि यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी वाम मार्गाचा अवलंब केला. मिराज आणि वैभवने चोरी केलेले दागिने ज्या सोनारांनी विकत घेतले, त्या सोनारांचा शोध पोलीस घेत आहेत.
(Taarak Mehta Ka Ooolath Chashmah fame actor Miraj Kapadi arrested in chain snatching case)
अनिल देशमुखांचा राजीनामा, कंगना रनौत म्हणते ‘यह तो सिर्फ़ शुरुआत है…’
Sachin Vaze: कार संपल्या, वाझे प्रकरणात आता स्पोर्टस बाईकची एन्ट्री; ‘ती’ दुचाकी NIAच्या ताब्यात
The Intern | ऋषी कपूरच्या जागी अमिताभ बच्चन यांची वर्णी, दीपिकासोबत पुन्हा एकदा दिसणार बिग बी!@SrBachchan | @deepikapadukone | #DeepikaPadukone | #AmitabhBachchan | #TheIntern | #Bollywood https://t.co/sunKiYFm05
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2021