Happy Birthday Arvind Swamy: आपल्यातले असे अनेक जन आहेत ज्यांना 90 च्या दशकातले चित्रपट आणि गाणी आजही आवडतात. ते चित्रपट आणि गाणी अनेकांच्या ह्रदयात आजही कोपराकरून आहेत. तर 90 च्या दशकातील हिंदीत गाजला रोजा आणि बॉम्बे म्हटलं की त्याची बातच वेगळी. आजही याचित्रपटांच्या गाण्यांवर लोक रिल बनवतात. तर गाने ही म्हणतात, रोजा जानेमन, तू ही मेरा दिल, तुझ बिन तरसे नैना…. पण ज्या अभिनेत्यावर हे गाणे चित्रीत झाले. जो चित्रपटात मुख्य भुमिकेत होता. त्याचे नाव आजही अनेकांना आठवत नसेल… तो होता… दक्षिणात्य सुपरस्टार अरविंद स्वामी (Southern Superstar Arvind Swamy). दक्षिणात्य सुपरस्टार स्वामी याचा आज वाढदिवस (Birthday) आहे. तो आज 51 वर्षांचा झाला आहे. त्यांचा जन्म 18 जून 1970 रोजी चेन्नई येथे झाला. बॉलीवूडच्या रोजा (Bollywood Movies Rosa) आणि साऊथसह बॉम्बे सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या अरविंदवर अशी वेळ आली जेव्हा त्याने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आणि आपल्या कौटुंबिक व्यवसायाची काळजी घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो चित्रपटांमध्ये परतण्याच्या तयारीत असतानाच एक भीषण अपघात झाला. त्यामुळे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. तर लंगडा झाला. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला बराच वेळ लागला.
अरविंद स्वामी यांने वयाच्या 21 व्या वर्षी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. आणि त्यांनी मणिरत्नम दिग्दर्शित ‘थलापथी’ या चित्रपटात रजनीकांत यांची मुख्य भूमिका साकारली. देखणा अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण झाली. त्यानंतर तो मुख्य भूमिकेत दिसू लागला. त्याच्या मोहक स्वभावामुळे त्याला अधिक चाहते मिळाले. इंडस्ट्रीमध्ये 30 वर्षांहून अधिक काळ अरविंद स्वामी हा काम करत आहे. तर तो दक्षिणात्य सुपरस्टार म्हणून चित्रपट क्षेत्रात चमकत आहे. तर त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त त्याच्यावर चाहत्यांकडून आणि त्याच्या मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यामुळे त्याचा खास दिवस अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी, आम्ही अभिनेत्याबद्दल काही खास गोष्टी आपल्याला सांगणार आहोत.
अरविंद स्वामींनी 1994 मध्ये गायत्रीशी लग्न केले आणि त्यांना अधीरा (मुलगी) आणि रुद्र (मुलगा) ही दोन मुले आहेत. मात्र, 15 वर्षे एकत्र राहिल्यानंतर अरविंद स्वामी आणि गायत्री यांचा 2010 मध्ये घटस्फोट झाला. अरविंद स्वामी याचे 2012 मध्ये अपर्णा मुखर्जीशी लग्न झाले आणि तेव्हापासून हे जोडपे आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे.
प्रेक्षकांनी अरविंद स्वामी यांला चित्रपटांमध्ये अनेक पात्रे साकारताना पाहिले आहेत. पण अरविंद स्वामी याला चित्रपट दिग्दर्शित करायचे आणि त्यात मुख्य भूमिका करण्याची इच्छा आहे. अरविंद स्वामी याने यासाठी दोन स्क्रिप्टही तयार केल्या असून भविष्यात तो एका चित्रपटाचे दिग्दर्शन करेलच.
एका मुलाखतीत अरविंदने सांगितले होते की, त्याला दहावीनंतर डॉक्टर बनायचे होते. जरी माझ्या वडिलांची इच्छा होती की मी त्यांचा व्यवसाय सांभाळावा. कॉलेजच्या दिवसात मी पॉकेटमनीसाठी मॉडेलिंग करायचो. नंतर मणिरत्नम यांनी मला एका जाहिरातीत पाहिले आणि मीटिंगला बोलावले. यानंतर त्यांनी आणि संतोष सिवन यांनी मिळून मला चित्रपट आणि अभिनयाचे बारकावे शिकवले. मणिरत्नमने मला पहिला ब्रेकही दिला. जो ‘थलापथी’ होता.
अरविंद स्वामी हा तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांचा सुपरस्टार आहे. पण त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अरविंदने 1991 मध्ये मणिरत्नम यांच्या ‘थलपथी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर 1992 मध्ये तो मधूसोबत ‘रोजा’ चित्रपटात दिसला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘रोजा’ या चित्रपटाला अरविंदच्या करिअरला खूप साथ मिळाली. हा चित्रपट तमिळमध्ये प्रदर्शित झाला होता. पण त्याचे हिंदी डबिंगही खूप गाजले होते. रोजा या चित्रपटासाठी अरविंदला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते.
‘रोजा’ चित्रपटातील मधु आणि अरविंदची रोमँटिक केमिस्ट्री सर्वांनाच आवडली होती. गंमत म्हणजे आता 29 वर्षांनंतर हे दोन्ही स्टार थलायवीमध्ये पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात मधु एमजीआर यांच्या तिसऱ्या पत्नी व्हीएम जानकी रामचंद्रन यांची भूमिका साकारत आहे. ‘रोजा’ चित्रपटातील अरविंद आणि मधूच्या कास्टिंगबद्दल काही मनोरंजक किस्से आहेत. दोघेही चित्रपटासाठी मणिरत्नमच्या पहिल्या पसंती नव्हते. राजीव मेनन यांनी चित्रपट करण्यास नकार दिल्यावर अरविंद यांना साइन केले. त्याचवेळी, मधूच्या आधी, हा चित्रपट ऐश्वर्या रायला ऑफर करण्यात आला होता. ज्याला तिने तारखांच्या कारणांमुळे नकार दिला होता.
त्याचवेळी अरविंदच्या बॉलीवूड करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्याने 1998 मध्ये ‘सात रंग के सपने’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत जुही चावला होती. मात्र, या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही.
यानंतर अरविंद स्वामी, मनीषा कोईराला आणि काजोलसोबतही दिसला. 2016 मध्ये तो ‘डियर डॅड’मध्येही दिसला, पण बॉलिवूडमधील त्याची कारकीर्द फारशी चांगली गेली नाही, पण तो दक्षिणेत चमकत राहिला. थलायवी या चित्रपटाद्वारे अरविंद हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. या चित्रपटात तो एमजीआरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहे.