तेजस्वी- करण कुंद्रा लवकरच अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्यानेच केला असा खुलासा

| Updated on: Mar 22, 2025 | 6:39 PM

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या लग्नाची चर्चा सतत जोर धरत आहे. जरी, दोघांनीही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही, परंतु अलीकडेच अभिनेत्रीच्या आईने त्यांच्या लग्नाबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यानंतर आता करणची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

तेजस्वी- करण कुंद्रा लवकरच अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्यानेच केला असा खुलासा
Tejasswi Prakash and Karan Kundra Wedding
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बॉलिवूडप्रमाणेच हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक कपल आहेत, जी चाहत्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये असतात. यामध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या जोडीचेही नाव समाविष्ट आहे. दोघांची भेट बिग बॉस 15 च्या दरम्यान झाली होती, त्यानंतर त्यांचे नाते सुरू झाले. गेल्या काही काळापासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. तसेच सर्वांना माहित आहे की सध्या तेजस्वी सेलिब्रिटी मास्टरशेफ शो करत आहे. या काळात, अभिनेत्रीची आई देखील शोमध्ये आली होती तेव्हा त्यांना तेजस्वीच्या लग्नाबद्दल विचारलं असता त्यांनी लवकरच होणार असल्याचे संकेत दिले आहे.

तेजस्वीसोबतच्या लग्नावर करणचे उत्तर 

आता तेजस्वीच्या आईनंतर आता करण कुंद्राचीही याबाबत प्रतिक्रिया समोर आली आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान करणला त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा उत्तर देताना, अभिनेत्याने त्याच्या वडिलांच नाव घेत उत्तर देणं टाळलं आहे. तसेच तेजस्वीच्या आईने त्यांच्या लग्नाबद्दल दिलेल्या कबुलीबद्दल विचारलं असता करण उत्तर दिलं की “मला याबद्दल काहीही माहिती नाही”.

“माझ्या लग्नाबद्दल वडिलांना विचारा”

यासोबतच, त्याला त्याचे वडिल मुंबईत त्याला भेटण्यासाठी येतायत म्हणजे काही लग्नाची बोलणी करायला येतायत का असा पश्न विचारताच, तो म्हणाला, “मला कसं कळेल, सगळे प्रश्न मलाच विचारणार का? माझे वडील येत आहेत त्यांना काय ते विचारा.लग्नाच्या वैगरे गोष्टी मुलांना विचारत नसतात” असं म्हणत त्याने तेव्हाही उत्तर देणे टाळले आहे.

करणने दिली लग्नाबद्दलची छोटीशी हिंट 

मात्र तथापि, लग्नाबद्दल बोलताना करणने असेही म्हटले की, “जेव्हा वेळ येईल तेव्हा मी त्याबद्दल विचार करायला सुरुवात करेन. लग्न मोठं करायचं की अगदी थोडक्यात याबद्दलही मला विचार करायचा आहे.” असं म्हणत त्याने लग्नाबद्दल छोटीशा हिंटही दिली. तथापि, दोघांचेही लग्न पाहण्याची इच्छा चाहत्यांचीही आहे. या दोघांचे लग्न म्हणजे टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात चर्चेत राहणाऱ्या लग्नांपैकी एक असणार आहे हे नक्की.

चाहत्यांनी जोडीला दिलं तेजरान नाव
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या चाहत्यांनी दोघांचेही नाव तेजरान ठेवले आहे. त्यामुळे चाहत्यांनाही करण आणि तेजस्वी लग्नाची घोषणा कधी करणार आहेत याबद्दल उत्सुकता आहे.