Photo : तेजस्विनी पंडितची नवी इनिंग, ‘क्रिएटीव्ह वाईब’च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण
VN |
Updated on: May 23, 2021 | 12:35 PM
अभिनयाची उत्तम जाण असलेली तेजस्विनी एक उत्तम उद्योजिकाही आहे आणि आता ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय.(Tejaswini Pandit's new inning, 'announcement of 'Creative Vibe' on birthday)
1 / 6
चित्रपट, मालिका, वेबसिरीज अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमधून आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस करणारी एम टाऊनमधील सुपरस्टार म्हणजेच तेजस्विनी पंडित.
2 / 6
अभिनयाची उत्तम जाण असलेली तेजस्विनी एक उत्तम उद्योजिकाही आहे. या दोन्ही भूमिका यशस्वीरित्या साकारत असतानाच तेजस्विनी आता आणखी एक नवीन जबाबदारी उचलण्यासाठी सज्ज झाली आहे.
3 / 6
आता ती ‘क्रिएटीव्ह वाईब' च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत असून या नवीन उपक्रमाचा शुभारंभ तिने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे.
4 / 6
तेजस्विनीचा मित्र संतोष खेर याच्यासोबत भागीदारीत सुरु केलेले 'क्रिएटीव्ह वाईब' मराठीसोबतच हिंदी मार्केटमध्येही लवकरच उतरणार आहे. संतोष खेर हे दुबईस्थित व्यावसायिक असून त्यांनाही कलेची प्रचंड आवड आहे.
5 / 6
कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन आणि योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी ही भागीदारी केली आहे.
6 / 6
‘क्रिएटीव्ह वाईब' अंतर्गत सिनेमा, सिरीज, शोज अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांची निर्मिती केली जाणार आहे.