आईचा लाडका यश ‘समृद्धी’ बंगला सोडताना भावूक; म्हणाला, कुणीतरी आता कधीच…

| Updated on: Nov 25, 2024 | 3:16 PM

Abhishek Deshmukh on Aai Kuthe Kay Karte serial : अभिनेता अभिषेक देशमुख याने इन्स्टग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 'आई कुठे काय करते' मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेबद्दल बोलताना अभिषेक भावूक झाला आहे. वाचा सविस्तर...

आईचा लाडका यश समृद्धी बंगला सोडताना भावूक; म्हणाला, कुणीतरी आता कधीच...
अभिषेक देशमुख मालिकेबद्दल काय म्हणाला?
Image Credit source: Instagram
Follow us on

स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा अखेरचा भाग आता शूट झाला आहे. या मालिकेतील कलाकार यावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मालिकेत यश हे पात्र साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने मालिकेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘समृद्धी’ बंगला सोडताना अभिषेक भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 5 वर्षांपासून सोबत असलेलं ‘कुणीतरी’ आता कधीच नसेल किंवा असेल यातली घालमेल घरी येईपर्यंत होती…, असं अभिषेक देशमुख म्हणाला आहे.

अभिषेक देशमुखची भावनिक पोस्ट

Good bye यश अरूंधती देशमुख..

आई कुठे..च्या Shooting चा शेवटचा दिवस..

2019-2024..1491 episodes..

PACK UP! ऐकलं आणि आत खोलवर काहीतरी झालं, 5 वर्षांपासून सोबत असलेलं “कुणीतरी”आता कधीच नसेल किंवा असेल ह्यातली घालमेल घरी येईपर्यंत होती..निघताना भेटीगाठी झाल्या,आठवणी निघाल्या तरी जरासं अस्वस्थ वाटत होतं..कुणाला तरी भेटायचं राहीलंय असं वाटतच होतं..शांतपणे प्रत्येक खोलीत जाऊन आलो,मेक अप रूम मधे, आरशात बघून आलो..पहील्यांदाच पायऱ्या सावकाश उतरलो..बॅग जराशी जड वाटत होती..निरोप घेताना ‘मी’ समृद्धी बंगल्याकडे बघत होतो की ‘तो’माझ्याकडे बघत होता कुणास ठाऊक!! त्याच्याकडे पाठ करून निघावसं वाटत नव्हतं.. “मालिका सुरू झाली म्हणजे कधीतरी संपणार..त्यात काय एवढं? ते फक्त काम आहे..” असं शहाण्यांना वाटत असेल..पण मला ते तितकं सोपं नाही वाटलं..!

‘यश’ने मला भरभरून प्रेम दिलं..ओळख दिली..अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही भेटलं तरी त्यांच्या डोळ्यातली चमक,आपलेपणा,आशिर्वाद उर्जा देणारे होते..TV ह्या माध्यमाची ताकद काय असू शकते ह्याची जाणीव करून देणारे अनेक प्रसंग होते..आईच्या भोवती फिरणारं यश चं वर्तुळ अखेर पुर्ण झालं पण ते पुन्हा पुन्हा गिरवलं जाईल ह्याची खात्री आहे कारण आई मुलाचं/मुलीचं नातं वैश्विक असतं..हे करण्याची मला संधी दिली त्या बद्दल मी आमच्या Project Head आणि लेखिका नमिता वर्तक @vartak.namita ह्यांचा ऋणी असेन..नमिता तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं..त्याच बरोबर आमचे Producer @rajan.shahi.543 @directorskutproduction Thank You so much🙏🏻..Big Thanks to स्टार प्रवाह.. @star_pravah सतीश राजवाडे @ankitasuniltawde आमचे दिग्दर्शक @ravikarmarkar @baresubodh @tusharvichare रोहीत पाटील आमचे DOP राजू देसाई,राजेश मोहीते, Editors, Art Director, आमच्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोले,चित्रा पाटणकर-गाडगीळ ,तुषार जोशी @tusharjosheee आणि अरूंधती पासून जानकी पर्यंत सगळे कलाकार..