‘या’ कारणामुळे निलेश साबळे याने ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम सोडला?
Nilesh Sable New Show Hastay Na Hasaylach Pahije After Chala Hawa Yeu Dya : निलेश साबळेचा चाहत्यांना सुखद धक्का; दोन हास्यसम्राटांसोबत नवा कोरा कार्यक्रम... काय आहे हा कार्यक्रम? कोणत्या कारणामुळे निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम सोडला? वाचा सविस्तर...
1 / 5
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र काही दिवसांआधी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. शेवटचा भाग प्रदर्शित होण्याआधीच निलेश साबळेने हा कार्यक्रम सोडला.
2 / 5
निलेश साबळेने हा कार्यक्रम का सोडला असावा? याचा सर्वत्र चर्चा होत होती. मात्र आता निलेशने केलेल्या एका घोषणेमुळे या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. निलेश साबळे एक नवा कोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
3 / 5
'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा नवा कार्यक्रम 20 एप्रिलपासून कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात निलेश साबळे दिसणार आहे. याच कार्यक्रमामुळे निलेशने 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम सोडल्याची चर्चा होतेय.
4 / 5
'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' असं म्हणत निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाची सुरुवात करत असे. याच टॅगलाईनवरून निलेशने नवा कार्यक्रम केला सुरू केला आहे. या कार्यक्रमात निलेशसोबत भाऊ कदम, ओंकार भोजने या कार्यक्रमात दिसणार आहे.
5 / 5
'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' या कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. भाऊ कदम, ओंकार भोजने, सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम, रोहित चव्हाण आणि इतर कलाकार या कार्यक्रमास असतील. भरत जाधव आणि अलका कुबल सेलिब्रिटी पाहुणे म्हणून दिसणार आहेत.