बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनचे होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करत आहे. घरातील सदस्यांचा टास्क दरम्यान आणि त्यानंतर होणारा राडा प्रेक्षक पाहत असतात. मात्र भाऊच्या धक्क्यावर कानउघडणी केल्यानंतर रितेश आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाणार आहे. आज बिग बॉसच्या घरात रितेश देशमुख जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. मात्र रितेश घरात आल्यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्य रडताना दिसत आहेत. आजच्या बिग बॉस मराठीचा आजचा प्रोमो समोर आला आहे.
रितेश भाऊ आज घरात जात सदस्यांना खास सरप्राईज देणार आहे. घरातील काही सदस्यांना रितेश भाऊ त्यांच्या मुलांचे व्हीडीओ दाखवणार आहे. हे व्हीडीओ पाहून सदस्यांचे डोळे पाणावले आहेत. घरच्यांशी बोलून सगळ्यांचे आनंदाश्रू वाहणार आहेत. त्यामुळे रितेश देशमुख सर्वांना धीर देताना दिसून येत आहे. रितेशच्या घरात जाण्याने सर्वच सदस्यांना खूप आनंद झाला आहे. रितेश भाऊ सदस्यांची शाळा घेत असला तरी प्रेक्षकांप्रमाणे घरातील सदस्यांनी त्याला आपलंसं केलं आहे. समोर आलेल्या व्हीडीओमध्ये हे दिसत आहे.
‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या प्रोमोमध्ये रितेशने पॅडीला चक्रव्यूह रूममध्ये बोलवलं आहे. यांनी कदाचित प्रत्येक गोष्टीत आपला स्वार्थ बघितला असेल, घराबाहेर गेल्यानंतर त्यांना कळेल आपली तेव्हाची स्टेटमेंट खूप चुकीची होती. कारण मी कधीच स्वार्थीपणे कोणती गोष्ट केली नाही. प्रत्येक गोष्टीत नि:स्वार्थ भावना होती, असं पॅडी म्हणतो. त्यानंतर बाहेर येत पॅडी अंकिता आणि डीपीचे आभार मानताना दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आज कोणाचा प्रवास संपणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. तसंच आजच्या भागात रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना मोठा धक्का देखील देणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्यात अग्रेशनच्या सगळ्या सीमा पार करण्यात आल्या. धक्काबुक्कीत आर्याला निक्कीची हात लागला. त्यानंतर आर्याचा संयम सुटला आणि आता मारेल असं म्हणत तिने निक्कीच्या कानशिलात लगावली. आर्याने बिग बॉसच्या मुलभूत नियमांचे उल्लंघन केलं आहे. त्यामुळे आता तिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.