‘बिग बॉस मराठी’च्या घराची चौथ्या आठवड्याची निक्की कॅप्टन झाली आहे. खरंतर हे कॅप्टनसीपद निक्कीकडे अरबाजमुळे आलं. पण कॅप्टन पद मिळाल्यानंतर निक्कीचं एक वेगळचं रूप पाहायला मिळालं. निक्कीने कॅप्टनसीचा चुकीचा वापर केला. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेशने कॅप्टन निक्कीची चांगलीच शाळा घेतली आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख निक्कीला चांगलच सुनावताना दिसणार आहे. रितेशने निक्कीला कठोर शब्दात सुनावलं आहे. निक्की तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि तुमची बुद्धीदेखील हलकीच आहे. तुम्हालाना या घरातले चावी मारतात…मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका, असं रितेश म्हणाला.
‘बिग बॉस मराठी’ चा हा गेम डोक्याने खेळण्याचा आहे. रितेश भाऊ दर आठवड्याला सदस्यांची हजेरी घेताना दिसून येतो. या आठवड्यातही तो सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसून येणार आहे. सध्याच्या या सिझनमधील स्पर्धकांची चर्चा होत असते. असं असतानाही काही सदस्यांवर प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळते. जान्हवी किल्लेकर आणि निक्कीला प्रेक्षक ट्रोल करत आहेत. रितेशनेही निक्कीला भाऊचा धक्का दरम्यान सुनावलं आहे.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील आगामी ‘दुर्गा’ या मालिकेची टीम आज भाऊच्या धक्क्यावर हजेरी लावणार आहे. दरम्यान दुर्गा मालिकेतील दुर्गा सदस्यांसोबत रॅपिड फायर खेळणार आहे. आजच्या भागात रॅपिड फायरमध्ये दुर्गा अभिजीत सावंतला विचारते, टीम B मधूल एका सदस्याला काढून टीम A मधल्या एका सदस्याला घ्यायचं असेल तर कोणाला काढाल आणि कोणाला घ्याल? यावर अभिजीत आर्याला काढून इरिनाला घेईल, असं उत्तर देतो.
या क्षणाला सगळ्यात जास्त कोणाची आठवण येते? असं विचारल्यावर सर्वात जास्त घराची आठवण येते, अभिजीत म्हणतो. अंकिता आणि निक्कीमध्ये सर्वोत्कृष्ट कॅप्टन कोण? यावर अभिजीत अंकिताचं नाव घेतो. तर टॉप 3 सदस्य हे निक्की, अंकिता आणि अरबाज हे आहेत, असं अभिजीत सांगतो.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या विशेष भागात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दराडेला विचारणार आहे, माचिसचं काम काय? उत्तर देत छोटा पुढारी म्हणतो, काडी लावणं… त्यावर बिग बॉस मराठी’च्या घरातला कोणता सदस्य आहे जो घरात आग लावायचं काम करतो?, असं रितेश भाऊ छोटा पुढारीला विचारतो. रितेश भाऊला उत्तर देत छोटा पुढारी डीपीचं नाव घेतो. माझ्या मते, माचिस मी डीपी दादाला देऊ इच्छितो.. कारण निक्की आणि माझं जे भांडण झालं ते डीपी दादांमुळे झालं होतं, असं तो म्हणतो.