आधी मी जितका अधीर होतो, तितका…; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितली हळवी बाजू

| Updated on: Jun 13, 2024 | 3:12 PM

Actor Sankarshan Karhade on Fatherhood : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मनमोकळ्या गप्पा मारताना आपल्याला दिसतो. 'ड्रामा ज्युनिअर्स' कार्यक्रमाच्या निमित्ताने संकर्षणने एक त्याच्या पालकत्वाचा अनुभव शेअर केला. यावेळी त्याने विविध गोष्टींवर भाष्य केलं. वाचा सविस्तर...

आधी मी जितका अधीर होतो, तितका...; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितली हळवी बाजू
Follow us on

कुणाही व्यक्तीसाठी पालक होणं ही खूप खास गोष्ट असते. त्यातही जर जुळ्या मुलांचे तुम्ही पालक असाल तर ही गोष्ट आणखी विशेष असते. मी दोन जुळ्या मुलांचा बाबा आहे. 27 जूनला त्यांना 3 वर्ष पूर्ण होतील. बाबा म्हणून खूप संयम शिकलो आहे आणि माझी नवीन मालिका ‘ड्रामा ज्युनिअर्स’ मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत या संयमाचा खूप उपयोग होणार आहे. आधी मी जितका अधीर होतो तितका राहिलो नाही. कारण लहान मुलांना सांभाळणं, त्यांना वाढवणं अतिशय संय्यमाचं काम आहे, असं संकर्षण म्हणाला.

बाबा झाल्यावर बदललो- संकर्षण

लहान मुलं कुठल्या क्षणी काय मागतील, कसे वागतील, कसे पाहतील आणि काय करतील ह्याचा काहीच नेम नसतो. अश्यावेळी तुम्ही थकलेले असाल, तुम्ही काम करून घरी आलेले असाल. वेगळ्याविचारात असाल त्याच्यावर तुम्हाला रागवून रिअॅक्ट करण्याची परवानगीच नाही. त्यांना कळत नाही की ते आता काय करतायत. त्याच्यामुळे त्यांना सांभाळणं आणि हसतं ठेवणं भयंकर संयमाचं काम आहे. एक बाबा म्हणून माझा संयम प्रचंड वाढला आहे. मी माझा राग राखून ठेवतो आणि जीव उधळून प्रेम करतो, असं संकर्षण म्हणालाय.

मला माझी लहान बाळं एक क्षण ही रडलेले आवडत नाही. मी माझ्या बायकोला शलाकाला तेच सांगतो की ते रडत असताना त्यांना काय पाहिजे ते दे आणि जेव्हा त्यांचं रडणं थांबव. त्यांना मी जवळ घेऊन समजावतो आणि त्यांना ते कळतं, असं संकर्षण म्हणाला.

संकर्षण लवकरच झी मराठीवर परीक्षक म्हणून दिसणार आहे. ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत तो दिसणार आहे. जिथे तो चिमुकल्या स्पर्धकांना मार्गदर्शन करताना दिसेल. आपल्या खाजगी आयुष्यात संकर्षण दोन चिमुकल्यांचा बाबा आहे आणि त्याने आपला बाबा म्हणून अनुभव व्यक्त केला. मी माझ्या बाबांकडून काय शिकलो आणि त्यांच्याकडून अनेक गुण घेतले, असं संकर्षण कऱ्हाडे याने सांगितलं.

“माझे बाबा प्रामाणिक माणूस”

माझ्या बाबांबद्दल बोलायचं झालं तर ते अत्यंत प्रामाणिक आहेत. ते काम नियमाने नित्याने सचोटनी करणारा माणूस आहेत. हा बाबांचा गुण मला खूप आवडतो. त्यांच्यातली भावनिकता आणि खरेपणा खूप आवडतो आणि त्यांचा मुलगा म्हणून मी कायम माझ्या वागण्यात तो प्रामाणिकपण आणि ती भावनिकता आणायचा प्रयत्न करतो. बाबानी संपूर्ण कुटुंबाला उत्तम आयुष्य कसं द्यायचं हे काटाक्षने पाळलं आणि एक छान आयुष्य दिलं आणि त्याचंच मी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत आहे, असंही संकर्षण म्हणाला.