‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पर्वाचा विजेता कोण होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक खास पाहुणा येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग सदस्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खूपच खास असणार आहे. आज घरात स्पेशल गेस्ट म्हणून ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ‘आपला माणूस’ शिव ठाकरे येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात त्याने ग्रँड एन्ट्री केली आहे. त्याच्या येण्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील वातावरण प्रफुल्लित झालं आहे.
‘बिग बॉस मराठी’ च्या घरातील नवा प्रोमो समोर आला आहे. बिग बॉसने शिव ठाकरेचं स्वागत केलं आहे. सदस्यांच्या आजवरच्या प्रवासाचे हटके सेलिब्रेशन होणार शिव ठाकरेसोबत… आपल्या एन्ट्रीने घरात एक वेगळाच उत्साह आणला आहे, असं म्हणत बिग बॉसने शिव ठाकरेचं स्वागत केलं आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा शिव ठाकरे विजेता होता. आता शेवटच्या आठवड्यात तो सदस्यांना काय टिप्स देतो हे पाहावे लागेल.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात शिव ठाकरेने एन्ट्री केली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाताच त्याने सगळ्यांना प्रेमाची मिठी मारली. तसंच ग्रॅन्ड सेलिब्रेशन होणार असल्याचं शिवने सांगितलं. अतिशय भव्य-दिव्य हे सेलिब्रेशन असेल. बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकं ग्रँड सेलिब्रेशन होईल. तुम्हा सर्वांना संपूर्ण महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा आणि सॅल्यूट!, असं शिवने बिग बॉसच्या घरातील सदस्यांशी संवाद साधला. आता शिव काय हटके सेलिब्रेशन करणार हे पाहाणं महत्वाचं असणार आहे.
शिव ठाकरे याआधी ‘बिग बॉस मराठी’त होता. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता आहे. ‘बिग बॉस’ हिंदीच्या 16 व्या सिझनचा तो रनरअप होता. खतरों के खिलाडीच्या 13 व्या सिझनचा तो फायनलिस्ट होता. रूडीजच्या 15 सिझनचा तो सेमी फायनलिस्ट होता. आज तो पाहुणा म्हणून तो ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आला आहे.