मुंबई | 30 जानेवारी 2024 : बिग बॉसचा 17 वा सिझन संपला आहे. हा सिझन बऱ्याच कारणांनी गाजला. स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकीने जरी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली असली. तरी या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती एका खास जोडीची… अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन या दोघांची बिग बॉसच्या या सिझनमध्ये जोरदार चर्चा झाली. लोकांनी या जोडीला प्रेम दिलं. या दिलेल्या प्रेमासाठी अंकिता लोखंडेने चाहत्यांचे आभार मानलेत. तिने एक व्हीडिओ शेअर करत तिने चाहत्यांना धन्यवाद दिले आहेत.
एक प्रवास पवित्र रिश्तापासून सुरु झाला होता. आता हा प्रवास आणखी जास्त आठवणीत राहणारा झाला आहे. त्याला कारण आहे, ‘रिश्तो वाली लडकी’ला तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे… माझं हरणं किंवा जिंकणं तितकं महत्वाचं नाही. जितकं तुमचं माझ्यावरचं प्रेम आणि विश्वास आहे. तुमच्या प्रेमानेत मला इथं पर्यंत पोहोचवलं आहे, असं अंकिता म्हणाली.
अर्थातच चढ-उतार येत होते… थोडं निघून गेलं. थोडं थांबलं. पण या सगळ्यात तुम्ही लोक माझ्या पाठीशी उभे राहिलात! मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि प्रेम केल्याबद्दल तुमच्यापैकी प्रत्येकाचे खूप खूप आभार. सर्व #AnkuHolics, आपण सर्वांनी केलेल्या प्रयत्नांसाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद हा शब्द अगदी लहान आहे. पण तुमच्यासाठी एक Virtual झप्पी!, असं अंकिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अंकिता लोखंडेने अभिनेता सलमान खानचेही आभार मानलेत. तुम्ही माझ्यासोबत जे बोललात. त्यामुळे मी टिकून राहिले. गोड शब्दांसाठी सलमान सर यांचे विशेष आभार, असं अंकिता म्हणाली. ही पोस्ट खास सगळ्या चाहत्यांसाठी आहे. तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल मी तुमचे आभार मानते. मनापासून धन्यवाद, असं म्हणत अंकिताने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.
बिग बॉसच्या घरातील काही खास फोटो अंकिताने शेअर केले आहेत. बिग बॉस 17 च्या घरातील ही शेवटची रात्र होती, असं म्हणत अंकिताने हे फोटो शेअर केलेत.