‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने राजकारण एन्ट्री केली आहे. अश्विनीने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत अश्विनीने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर अश्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नाना…. तुमची सगळी स्वप्नं मी पूर्ण करेन.. जबाबदारीने…, असं अश्विनी म्हणाली आहे. माझे वडील पण शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत होते, असं अश्विनी महांगडे हिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी कायम मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले. अगदी गावातल्या निवडणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देवून ते काम करायचे. जेवायला बसल्यावर चर्चा सुद्धा त्याच. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणे हे रक्तातच होते त्याच्या. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचे.
पण साधारण 4 वर्षांपूर्वी त्यांना जाणवले की #ताई (मी) समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षाने जबाबदारी दिली तर काम करण्याचा आवाका वाढेल. हे त्यांचे स्वप्न अर्थात 4 वर्षानंतर आज #कोजागिरी_पौर्णिनेच्या मुहूर्तावर पूर्ण झाले. ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल. स्वीकारलेले काम जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झाले. त्यांचे आभार..
#राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्ष_शरदचंद्र_पवार यांनी #महाराष्ट्र_प्रदेश_नॅशनॅलिस्ट_महिला_काँग्रेस_पार्टी_-_शरदचंद्र_पवार_पार्टीच्या #उपाध्यक्ष_पदी_नियुक्ती_केली त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे.
मा. शरदचंद्र जी पवार साहेब, मा. सुप्रियाताई सुळे, मा. जयंत पाटील, मा. अमोल दादा कोल्हे, मा. बाळासाहेब पाटील, मा. शशिकांत शिंदे, मा. मेहबूब शेख तसेच माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे आमचे मा. प्रसाद काका सुर्वे, मा. डॉ. नितीन सावंत, मा. राजकुमार पाटील, मा. बाबर, मा.संतोष पवार यांची ऋणी आहे.
#ashvini_mahandage
#राजकारणातून_घडेल_समाजकार्य