‘बिग बॉस मराठी’चा 5 वा सिझन प्रचंड गाजला. या सिझनमधील स्पर्धकांना प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. असाच एक स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण… सूरज चव्हाण याचा साधेपणा प्रेक्षकांना भावला. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी’ चा विजेता झाला. ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर आता त्याला भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सूरज हा बारामतीतील मोढवे गावचा आहे. त्याच्या मूळगावी त्याला भेटायला त्याचे चाहते येत आहेत. गर्दी करत आहेत. मात्र या सगळ्या भेटीगाठींमध्ये एका खास व्यक्तीनेही सूरजच्या घरी जात त्याची भेट घेतली आहे.
‘बिग बॉस मराठी’ सिझन 5 मधील स्पर्धक जान्हवी किल्लेकर हिने सूरज चव्हाणच्या मोढवे गावात जात भेट घेतली. यावेळी सूरजनेही तिचं स्वागत केलं. यावेळी ‘बिग बॉस मराठी’ इतर गप्पा झाल्या. या भेटीचे फोटो सूरज चव्हाणने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोला सूरजचे दिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. ‘लाडकी माझी ताई’ असं म्हणत सूरजने जान्हवीसोबतचे फोटो शेअर केलेत.
जान्हवी आणि सूरजच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय.ऐका रागीट ॲक्टिव आणि सरळ सरळ शब्द फेक करणारी जान्हवी आणि सरळ साधा सूरज यांचे मधील बहीण भाऊ असे असलेले प्रेम हे एक उदाहरण आहे . बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांची एकी पाहून सर्वचजण जिंकले असे वाटत आहे. हीच आहे आपले महाराष्ट्राची संस्कृती आहे, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.
सूरज तू फक्त बिग बॉस जिंकला नाहीस सर्वांची मने जिंकला आहेस….. मग ते बिग बॉस चे घर असो किंवा पूर्ण महाराष्ट्र असो.. जे नाते जोडले आहे ते सदैव असेच राहावे… पॅडीदादा सोबतचे नाते तर अजून भारी वाटते.., असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय. एक नात रक्तापलिकडच, अशीची कमेंट त्याच्या चाहत्याने केली आहे.
एक महीला एवढ्या जवळीकतेने तेव्हाच फोटो काढते जेव्हा तिला समोरच्या पुरुषामध्ये निस्वार्थ प्रेम आढळून येत आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते……फार कमी माणस असतात अशी जगामध्ये…., अशी कमेंट सूरजच्या चाहत्याने केलीय.
भाऊ दिवसेंदिवस हँडसम होत चाललाय, असंही एकाने म्हटलं आहे.