स्टार प्रवाहवरची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेतील अरूंधती तर प्रत्येकाला आपल्यातलीच एक वाटते. गृहिणींना तिच्या स्वत: चं प्रतिबिंब दिसतं. काहींना ती आपल्या आईसारखी वाटते…. पण मालिकेत ‘सिंपल’ पात्र साकारणारी अरूंधती अर्थात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड स्टायलिश आहे. ती वेगवेगळे लूक ट्राय करत असते. आताही तिने साडीत खास फोटोशूट केलंय. हे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. एक कविता पोस्ट करत तिने हे फोटो शेअर केलेत.
मी एक फुलवेडी आहेच… फुलांवरच्या अनेक कविताही मी जमवल्या आहेत माझ्याकडे. त्यातली एक कविता खास तुमच्या साठी
फुलाफुलांचे ——-
कुणी बांधले दारा तोरण फुलाफुलांचे ?
आत घराच्या उभे नभांगण
फुलाफुलांचे
मौनाची बोलकी डहाळी दरवळलेली
नयनांना कळले संभाषण
फुलाफुलांचे
रोज नवा पाऊस बरसतो संवादाचा
किती किती झेलावे श्रावण
फुलाफुलांचे ?
जगण्यामधल्या काट्यांनाही
सुगंध आला
त्यांच्याभवती होते कुंपण
फुलाफुलांचे
पुन्हा पुन्हा वाढतात ठोके
हृदयामधले
फिरून आले नवे निमंत्रण
फुलाफुलांचे
स्पर्शासाठी ,गालांसाठी ,
अधरांसाठी
त्या रात्री शेजेवर भांडण
फुलाफुलांचे
कोण असा सुकुमार लाडका
वसंत होता?
जन्माला ठेवलेस तारण
फुलाफुलांचे
– रमण रणदिवे
सोशल मीडियावर मधुराणी प्रभुलकर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंना पसंती दिली होती. तर काहींनी कमेंट करत तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. प्रतिम विलोभनीय खूप सुंदर मनमोहक गुलाबाच्या अनेक फुलांमध्ये सर्वात सुंदर नी हसरा… ताजा टवटवीत गुलाब प्रमाण मनमोहक सुंदर हास्य फारच सुंदर आणि फोटोग्राफी देखील तितकीच सुंदर त्या जोडीला कविता तर अति उत्तम…, असं एका चाहत्याने म्हटलं आहे.
मधुराणीने काहीच दिवसांआधी पुण्यातील भाजी मार्केटमध्ये फोटोशूट केलं होतं. एक छान वेगळं फोटोशूट करायचं. बरेच दिवस मनात होतं आणि अचानक ही सगळी टीम जुळून आली… ह्या उत्साही आणि creative gang चे कौतुक करावं तेवढं कमीच… आणि ठिकाण आहे… पुण्यातील भाजी मंडई… माझ्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण… तुळशीबागेत माझं बालपण गेलं त्यामुळे मंडई हा बालपणीचा महत्वाचा भाग….! सकाळ- सकाळी भाजी लागत असताना केलेलं हे शूट कायम लक्षात राहील, असं म्हणत मधुराणीने हे क्लासी फोटो शेअर केलेत.