झी मराठीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वेगळी कथा असणाऱ्या या मालिकेचा प्रोमो समोर आल आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवी मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमधील दोन स्पर्धक एकत्र दिसणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’ च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे ही या मालिकेत दिसणार आहे. तर ‘बिग बॉस मराठी’ च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक वीणा जगतापदेखील या मालिकेत दिसणार आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ बिग बॉसच्या आणि मेघा धाडेच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का असणार आगे. या मालिकेचं अभिनेत्री मेघा धाडे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतक मेघा पुन्हा मराठी डेली सोपमध्ये दिसणार आहे. वीणा जगताप देखील या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघी पहिल्यांदाच एका मालिकेत काम करणार आहे. तसंच या मालिकेत सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, साईंकित कामत, गौरी किरण अश्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची गोष्टही खास आहे. ‘सावली’ नावाच्या मुलीची जी रंग रूपाने साधारण, पण स्वभावाने प्रेमळ, शब्दाची पक्की आणि अत्यंत सुरेल आवाजाची आहे. सावली बारावीपर्यंत शिकली आहे आणि तीच स्वप्न आहे संगीतात मास्टर्सचं शिक्षण पूर्ण करायचं.
विठ्ठलावर अपार श्रद्धा असलेली, कितीही विपरीत स्थितीतून मार्ग निघू शकतो, अशी आशावादी ही सावली आहे. तिचं तिच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. सावलीच्या जन्मावेळी एक मोठी उलाढाल होते. कान्हुच्या पोटी जन्माला आलेली हि सावळ्या रंगाची मुलगी जन्मल्यावर श्वास घेत नसल्यामुळे, एकनाथला मेलेली मुलगी झाली अशा निष्कर्षापर्यंत गाव पोहोचत असताना एकनाथ आपल्या मुलीला विठ्ठलाच्या चरणी ठेवतो आणि चमत्कार होतो. मुलीत प्राण फुकले जातात. म्हणून तिचे नाव सावली ठेवलं जातं. सावली, तिचं गाणं अन् तिच्या दिसण्यामुळे मिळणारी वागणूक अशी या मालिकेची गोष्ट आहे.