साडी नेसून फाईट…; पूर्वा कौशिकने सांगितला ‘शिवा’ साकारतानाचा अनुभव

| Updated on: Jun 26, 2024 | 7:19 PM

Purva Kaushik Experience about Shiva Serial : अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने तिच्या मालिकेतील कामाबद्दलचा अनुभव सांगितला आहे. शिवा मालिका साकारताना तिला वेगवेगळे अनुभव आले त्याबद्दल पूर्वा बोलती झाली. पूर्वाने तिच्या साडीतील फायटिंग विषयी सांगितलं आहे. वाचा सविस्तर...

साडी नेसून फाईट...; पूर्वा कौशिकने सांगितला शिवा साकारतानाचा अनुभव
पूर्वा कौशिक, अभिनेत्री
Image Credit source: Instagram
Follow us on

हटके स्टोरी असलेली ‘शिवा’ ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने ‘शिवा’ मालिकेत काम करतानाचा तिचा अनुभव सांगितला आहे. आधी शर्ट आणि जिन्समध्ये दिसणारी शिवा आता मात्र साडीत दिसते. साडीत फाईट करतानाचा अनुभव पूर्वाने सांगितला. साडीमध्ये फाईट सीन करण्याचा अनुभव खूप कमाल होता. मी आयुष्यात पूर्वा म्हणून हे करीन असं मला कधीच वाटलं न्हवत पण ह्या मालिकेच्या निमित्ताने मला हे सर्व करायला मिळालं ह्याबद्दल खरंच आनंद आहे. तशी मालिकेत शर्ट-पॅन्ट मध्ये छोट्या-मोट्या मारामाऱ्या केल्यात, पण जेव्हा साडी मध्ये फाईट सीन करायची चर्चा सुरु झाली तेव्हा थोडं दडपण आलं होतं कारण ते टीव्ही स्क्रीनवर प्रभावी आणि परिणामकारक दिसलं पाहिजे, असं पूर्वा म्हणाली.

साडीतील फाईट सीनबद्दल पूर्वाने काय म्हटलं?

‘शिवा’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात घर केले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडताना दिसत आहे. शिवाची स्टाईल घरा-घरात प्रसिद्ध झाली आहे मग तो शिवाचा शर्ट-पॅन्ट आणि बॉयकट असो किंवा लग्नानंतरचा साडीचा लुक असो. आता काय तर शिवाची साडी मध्ये फाईट सीनची सर्वत्र चर्चा होतं आहे. शिवा म्हणजेच पूर्वा कौशिक हिने साडीमध्ये फाईट सीन शूट करण्याचा अनुभव व्यक्त केला.

‘शिवा’ साकारतानाचा अनुभव

माझ्यात ते हावभाव, देहबोली त्या पोशाखानुसार योग्य येईल का याचं टेंशन आलं होतं. जेव्हा हा सीन करायला केली. तो अनुभव अविश्वसनीय होता. कुठच्याही कलाकाराच्या आयुष्यात असा क्षण त्याच्या अभिनयाच्या प्रवासात माईलस्टोन असतो आणि मला तो क्षण अनुभवायला मिळाला आहे. फाईट सीनच शूटिंग होतं असताना फाईट मास्टरचे मार्गदर्शन होतेच आणि सर्व गरजेची सावधगिरी घेऊनच आम्ही सगळं शूट करत होतो, असं पूर्वाने सांगितलं.

मला आधी वाटलं होतं की मी हे साडीत आणि हिल्सच्या सॅण्डलवर हे पेलवू शकेन का, शिवा नव्याने उभी राहायचा प्रयत्न करत आहे. तर ती कशी दिसेल आणि ते अगदी जस हवं होतं तसंच झालं. मला तर हार्नेसची खूप गंमत वाटत होती. खरं सांगायच झाले तर जास्त सराव नाही करावा लागला आणि मार्गदर्शन करणारी माणसं ही उत्तम होती, असंही पूर्वा म्हणाली.