‘शिवा’ ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील ‘शिवा’ हे पात्र नेहमीच्या साचेबद्ध भूमिकां पलिपडचं आहे. नेहमी संसारात रमणाऱ्या नायिका मालिकांमध्ये दाखवण्यात येतात. मात्र ‘शिवा’ ही वेगळी आहे. तिची स्टाईल वेगळी आहे. ती अनेक साहसी गोष्टी करत असते. या मालिकेत नुकतंच शिवाने सिलेंडर उचलण्याचा सिन दाखवण्यात आला. यावर ‘शिवा’ अर्थात अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने प्रतिक्रिया दिली आहे. आजारी असताना हा सिन कसा शूट केला. यावर पूर्वा बोलती झाली.
‘शिवा’ मालिकेत शिवाचे कारनामे आणि कसोटी पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून वाट पाहत असतात आणि हल्लीच एक सीन झाला जिथे शिवा सिलेंडर उचलते. या सीनला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हा सीन करण्यासाठी शिवा म्हणजेच पूर्वाची तारेवरची कसरत कशी झाली होती. अभिनेत्री पूर्वा कौशिकने आपला अनुभव व्यक्त केला आहे. मालिकेतील सिलेंडर उचलायच्या या सीनची गंमत अशी की, ज्या दिवशी शूटिंग झालं. त्याच्या 3 दिवस आधी माझी तब्बेत प्रचंड बिघडली होती. त्या आधीच माझ्या कानावर आलं होतं की सिलेंडर उचलायचा एक सीन आहे, असं पूर्वाने सांगितलं.
दिग्दर्शक सर आणि मी एकदम जोशात होतो की सिलेंडर उचलायचा आहे. पण जेव्हा मी आजारी पडले तेव्हा वाटलं की हे मला जमेल का कारण खूप अशक्तपणा आला होता. सरांनी प्रोत्साहन दिलं. शांत डोक्याने आणि मनाने शांत राहा, सगळं बरोबर होईल, असं त्यांनी सांगितलं. हे सगळं होत असताना दुसरीकडे कळलं की सिलेंडर मिळू शकला नाही, असं पूर्वा कौशिक म्हणाली.
अर्धा भरलेला सिलेंडर होता तो, मी थोडी घाबरले होते. तुम्हाला सोशल मीडियावर मी टाकलेल्या व्हीडिओमध्ये दिसलेच असेल की दिग्दर्शक सर आणि पूर्ण टीम कशी माझी मदत करत आहेत. माझी काळजी घेत आहेत. हे सगळं घडून आलं पूर्ण टीममुळे, कारण तो पूर्ण एक सीन होता मी तो सिलेंडर उचलून पुढंपर्यंत आणून, घरापर्यंत नेऊन तिथे लावते. शूट करताना ही मजा आली आणि याच श्रेय मी मारुती सरांना देते, असं पूर्वाने सांगितलं.