निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमात का गेली नाही?; श्रेया बुगडेने ‘ते’ कारण सांगितलं

| Updated on: Jul 14, 2024 | 7:21 PM

Actress Shreya Bugde Statement : अभिनेत्री श्रेया बुगडे ही तिची मतं ठामपणे मांडत असते. आताही तिने तिच्या करिअर विषयीचं तिचं मत मांडलं आहे. 'चला हवा येऊ द्या' हा रिॅअॅलिटी शो बंद झाल्यानंतर श्रेयाने ब्रेक घेतला आता ती नव्या जोमाने कामाला लागली आहे. श्रेया काय म्हणाली? वाचा...

निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमात का गेली नाही?; श्रेया बुगडेने ते कारण सांगितलं
निलेश साबळे, श्रेया बुगडे
Image Credit source: Instagram
Follow us on

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिकाराज्य केलं. या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. 10 वर्षे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केल्यानंतर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमातील कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मात्र ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर या टीममधील कलाकारांनी वेगवेगळ्या माध्यमात काम सुरु केलं. अभिनेत्री श्रेया बुगडे ही देखील एका मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा उत्साहात नव्या प्रोजक्टमधल्या कामात व्यस्त झाली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ च्या टीमबद्दल एका मुलाखतीदरम्यान श्रेया बुगडे बोलती झाली आहे.

निलेश साबळेच्या शोमध्ये का गेली नाही?

‘चला हवा येऊ द्या’ नंतर अभिनेता निलेश साबळे याने ‘हसताय ना? हसायलाचं पाहिजे’ हा नवा शो सुरु केला. या कार्यक्रमात तू का गेली नाहीस?, असा प्रश्न श्रेया बुगडेला एका मुलाखती दरम्यान विचारण्यात आला. तेव्हा’चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर प्रत्येकाने स्वतंत्रपणे निर्णय घेतले. मी झी मराठी वाहिनीबरोबर कॉन्ट्र्ॅक्टमध्ये होते. त्यामुळे मी निलेशच्या शोमध्ये जाऊ शकले नाही, असं श्रेया बुगडे म्हणाली.

त्या ब्रेकची गरज होती- श्रेया

‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर सगळ्यांनाच एक ब्रेक होता. या ब्रेकमध्ये काय काय करायचं ते ठरवलं. या काळात मला एक हिंदी शोसाठी देखील विचारण्यात आलं. तो देखील मी केला नाही. कारण मला वाटलं की, खरंच मला एका ब्रेकची गरज होती. लगेच तशाच भूमिका करणं हे माझ्याकडून होणारं नव्हतं. त्यासाठी मी रिफ्रेश झालेली नव्हते. तेव्हा मी विचार केला की, त्या ठिकाणी गेल्यावरही मी काही नवीन करू शकणार आहे का? की पुन्हा तसंच काही करणार आहे. त्यामुळे थोडा काळ थांबून पुन्हा नव्याने नवीन पात्र किंवा काम करावंस वाटलं किंवा काहीच नाही तर किमान कोऱ्या पाटीने तरी मला काम करायचं होतं त्यामुळे मी तो ब्रेक घेतला. असं श्रेया बुगडे म्हणाली.