प्राणायाम, योगासनं अन् बरंच काही…; वर्षा उसगांवकरांच्या सौंदर्याचं रहस्य काय?

| Updated on: Sep 03, 2024 | 3:45 PM

Actress Varsha Usgaonker : अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचं स्किनकेअर रूटिन काय असतं? फिट राहण्यासाठी त्या काय करताता? वर्षा उसगांवकर यांच्या सौंदर्याचं रहस्य काय? याबाबत वर्षा यांनी बिग बॉस मराठीमध्ये भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

प्राणायाम, योगासनं अन् बरंच काही...; वर्षा उसगांवकरांच्या सौंदर्याचं रहस्य काय?
वर्षा उसगांवकर, अभिनेत्री
Image Credit source: Instagram
Follow us on

वर्षा उसगांवकर… मराठी सिनेसृष्टीतील मोठं नाव… त्यांचे सिनेमा, त्यांचं काम प्रेक्षकांना आवडतंच. पण त्यांच्या सौंदर्याचीही त्यांच्या चाहत्यांवर भूरळ आहे. 56 व्या वर्षीदेखील त्या तितक्याच फ्रेश आणि सुंदर दिसतात. त्यांच्या सौंदर्याचं रहस्य काय? ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वर्षा ताईंनी त्यांच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचं रहस्य सांगितलं आहे. आजच्या ‘अनसीन अनदेखा’मध्ये प्रेक्षकांना हे पाहता येईल. वर्षा उसगांवकर कॅप्टन झाल्यामुळे कॅरामल कस्टर्ड बनवून घरातील सदस्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. यावेळ वर्षा उसगांवकरांच्या चेहऱ्यावर आजही एक वेगळचं तेज आहे. यामागे नक्की काय रहस्य आहे असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडत असतो. आता बिग बॉस मराठीच्या घरात वर्षा यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.

वर्षा उसगांवकर काय म्हणाल्या?

वर्षा ताई कॅरामल कस्टर्ड खात कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांनी सौंदर्याचं रहस्य सांगितलं आहे. आमच्याकडे भरपूर दूध, अंडी आणि साखर असल्यामुळे आम्ही घरी कॅरामल कस्टर्ड बनवलं. जान्हवीने वेळात वेळ काढून हे कॅरामल कस्टर्ड बनवलं आहे. कॅरामल कस्टर्ड खाताना मला खूप छान वाटतंय. आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की कॅप्टनसीचं सेलिब्रेशन झालंय, असं त्या म्हणाल्या.

आता तुम्हाला कळलचं असेल माझ्या सौंदर्याचं रहस्य. मी सडपातळ असण्याचं रहस्य हेच आहे की मी सगळं खाते. प्राणायाम, योगासनं आणि घरचं जेवण करणं हेच माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे, असं कॅरामल कस्टर्ड खात वर्षा उसगांवकर पुढे म्हणत आहेत. वर्षा उसगांवकर यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

घन: श्यामच्या वागण्याची बिग बॉसच्या घरात चर्चा

आज अनसिन अनदेखामध्ये अंकिता, अभिजीत आणि पॅडी दादा आक्रमक घन:श्यामवर चर्चा करताना दिसत आहेत. घन:श्यामचं कठीण आहे. त्यांच्या लोकांमध्येही सतत त्याचं वाजत असतं, असं पॅडी म्हणतो. यावर अंकिता म्हणते,”त्याला बोलण्याची शिस्त नाही, तो त्याच्या मतांवर ठाम नाही”. घन:श्याम अग्रेसिव्ह आर्या आहे. काही बोलायला गेलो की तो वाकड्यातच जातो. त्याला कॅमेरा पहिला हवा असतो, असं अभिजीत म्हणतो. त्यावर अंकिता म्हणते,”हुशार आहे तो!”