झी मराठीवरची ‘अप्पी आमची कलेक्टर’ प्रेक्षकांच्या पसंतीला उतरते आहे. मालिकेतील अमोल अर्थात बालकलाकार साईराज केंद्रे याचं कामही प्रेक्षकांना आवडतं आहे. अशातच आता ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका रंजक वळणावर आली आहे. अप्पी आणि अर्जुन एकत्र यावेत यासाठी अमोल मागच्या कित्येक दिवसांपासून प्रयत्न करत होता. आपल्या आईबाबांमधील भांडण मिटावं यासाठी तो घरच्या सदस्यांच्या मदतीने वेगवेगळी शक्कल लढवत होता, असं असतानाच त्याच्या या प्रयत्नांना यश आल्याचं दिसत आहे. अपर्णा आणि अर्जुन एकत्र येणार आहेत. त्यामुळे अमोलसोबतच त्यांच्या घरच्यांनाही आनंद झालाय.
अप्पी आणि अर्जुनमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर अर्जुन त्याच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तो लग्नाचा निर्णय घेतो. आर्यासोबत त्याचा साखरपुडाही झाला आहे. पण नंतर पुन्हा एकदा अमोल आणि अप्पी अर्जुनच्या आयुष्यात येतात आणि तो त्याचा निर्णय बदलतो. आई- बाबा आणि कुटुंबाने एकत्र यावं, यासाठी अमोल घेत असलेले कष्ट पाहून अर्जुनही भावूक होतो. तो त्याचा निर्णय बदलतो.
अमोलच्या प्रयत्नानंमुळे अर्जुन-अप्पी एकत्र येत आहेत. अर्जुनने आर्याला सोडून अप्पी आणि अमोलसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आर्या सोबतचा साखरपुडा मोडतो. सर्वकुटुंब अर्जुनच्या निर्णयाने आनंद साजरा करत. तर रूपाली मनीला अप्पी आणि अर्जुनला वेगळे करण्याचा प्रयत्न करतेय. विनायक कौटुंबिक जमीन अमोलच्या नावे करतो आणि हे पाहून मनी कागदपत्रे चोरण्याची प्रयत्न करते.
अर्जुन अमोलची चित्र पाहून आश्चर्यचकित होतो. कुटुंबाचे लक्ष विचलित करण्यासाठी मनी सगळ्यांना मंदिरात जाण्याचा सल्ला देतो. मंदिरात अमोल आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. घरात कोणी नाही हे पाहून मनी जमिनीची कागदपत्रे चोरटे. अप्पी आणि अर्जुनला मनी मावशीनेच हे सगळं घडवून आणल्याची खात्री पटते. अर्जुन आणि अप्पी तरीही मनी मावशीला जवळ ठेऊन , तिला धडा शिकवण्याची योजना आखतात . अप्पी-अर्जुनचा नवीन संसार कसा असेल? मनी मावशीला अप्पी आणि अर्जुन कसा धडा शिकवणार? हे सगळं ‘अप्पी आमची कलेक्टर’ च्या पुढच्या भागात पाहायला मिळेल.