मुंबई : रॅपर एमसी स्टॅन हा छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या रियालिटी शोच्या 16 व्या सिजनचा विजेता ठरला आहे. एमसी स्टॅन शिव ठाकरे याला पछाडत 16 व्या सिजनचा विनर ठरला. तर शिव ठाकरे याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे हे दोघे अंतिम फेरीत पोहचले होते. दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत होती. मात्र अखेर मात्र एमसी स्टॅन याने बाजी मारली. बिग बॉस फिनालेच्या निमित्ताने याआधीच्या 15 मोसमांमध्ये विजेता ठरलेल्यांबाबत आपण जाणून घेणार आहोत.
सलमान खान याने एमसी स्टॅन याला बिग बॉसची ट्रॉफी दिली. हिरे आणि सोन्यापासून ही ट्रॉफी बनवण्यात आलेली आहे. या ट्रॉफीची किंमत 9 लाख 34 हजार आहे.या ट्रॉफीवर हिऱ्यांचे सुंदर काम करण्यात आले आहे. ही अत्यंत खास ट्रॉफी आहे.
एमसी स्टॅन ठरला बिग बॉस 16
Aapke pyaar aur votes ne banaaya inhe Bigg Boss ke season 16 Ka winner. ?❤️#BiggBoss16 #BB16 #BiggBoss #MCStan pic.twitter.com/zEFCUoVBnw
— ColorsTV (@ColorsTV) February 12, 2023
बिग बॉस सिजन 1
विनर | राहुल रॉय, बक्षिसाची रक्कम : 1 कोटी
बिग बॉस सिजन 2
विनर | आशुतोष कौशिक, बक्षिसाची रक्कम : 1 कोटी
बिग बॉस सिजन 3
विनर | विंदू दारा सिंह, बक्षिसाची रक्कम : 1 कोटी रुपये
बिग बॉस सिजन 4
विनर | श्वेता तिवारी, बक्षिसाची रक्कम : 1 कोटी रुपये
बिग बॉस सिजन 5
विनर | जूही परमार, बक्षिसाची रक्कम : 1 कोटी रुपये
बिग बॉस सिजन 6
विनर | उर्वशी ढोलकिया, बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये
बिग बॉस सिजन 7
विनर | गौहर खान, बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये
बिग बॉस सिजन 8
विनर | गौतम गुलाटी, बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये
बिग बॉस सिजन 9
विनर | प्रिंस नरूला,बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये
बिग बॉस सिजन 10
विनर | मनवीर गुर्जर, बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये
बिग बॉस सिजन 11
विनर | शिल्पा शिंदे, बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये, (शिल्पा : 44 लाख आणि विकास गुप्ता 6 लाख)
बिग बॉस सिजन 12
विनर | दीपिका कक्कड, बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये, (दीपिका : 30 लाख आणि दीपक ठाकूर 20 लाख)
बिग बॉस सिजन 13
विनर | सिद्धार्थ शुक्ला, बक्षिसाची रक्कम : 50 लाख (सिद्धार्थ 40 लाख, पारस छाबडा 10 लाख)
बिग बॉस सिजन 14
विनर | रुबीना दिलैक, बक्षिसाची रक्कम : 50 लाख , ( रुबीना 36 लाख आणि राखी सावंत 14 लाख रुपये)
बिग बॉस सिजन 15
विनर | तेजस्वी प्रकाश, बक्षिसाची रक्कम : 40 लाख
दरम्यान हा ग्रँड फिनाले तब्बल पाच तास चालला. या दरम्यान अनेक धमाकेदार डान् पाहायला मिळाले. त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रियंका चौधरी, शालिन भनोट आणि अर्चना गौतम या 5 जणांमधून बिग बॉस विनर म्हणून एमसी स्टॅन याची निवड करण्यात आली. बिग बॉस 16 ची 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरूवात झाली होती. यादरम्यान घरातील स्पर्धेकांनी जबरदस्त मनोरंजन केले आहे. विशेष म्हणजे बिग बॉस 16 सिजन टीआरपीमध्येही टॉपला राहिला.