आज जागतिक फ्रेंडशीप डे आहे. यानिमित्त सगळेच मित्र मैत्रिणी एकमेकांना शुभेच्छा देताना दिसतात. बिग बॉस मराठीच्या घरातही फ्रेंडशीप डे साजरा झाला. मैत्री म्हटलं की मजा, मस्ती आणि भांडण हे आलंच. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन आठवडा पूर्ण झाला असून आठवड्याभरातच घरातील सदस्यांमधील मैत्रीचं नातं अलगद फुलताना दिसून येत आहे. आज जगभरात फ्रेंडशिप डे साजरा होत आहे. रितेश भाऊच्या धक्क्यावरदेखील ‘फ्रेंडशिप डे’ साजरा झाला. नव्या मैत्रीची नवीन समीकरणं पाहायला प्रेक्षकांनादेखील आवडेल.
‘बिग बॉस मराठी’ च्या घरातील सदस्य एकमेकांच्या मागे बरंच काही बोलताना दिसून येतात. पण आज रितेश भाऊने त्यांना आमने-सामने उभं केलेलं पाहायला मिळाले. तसंच त्यांच्या मनातील पोल खोल देखील केली. फ्रेंडशिप डेनिमित्त ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर ‘दोस्तीत कुस्ती आणि फुल ऑन मस्ती’ पाहायला मिळाली. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा फ्रेंडशिप डे स्पेशल प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घरातील सदस्य फ्रेंडशिप डेचं खास लॉकेट एकमेकांना देत ‘मैत्री दिन’ साजरा करताना दिसत आहेत. भित्रा मित्र, दगाबाज मित्र, खोटारडा मित्र, बालिश मित्र, डबलढोलकी मित्र, असे वेगवेगळे लॉकेट सदस्य त्यांच्या मित्रांना घालताना दिसून येत आहेत.
प्रोमोमध्ये योगिता छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेला ‘डबलढोलकी मित्र’ हे लॉकेट देताना दिसून येत आहे. त्यावर घन:श्याम म्हणतो,”बघितलं ग्रुपची ताकद किती असते”. यावर योगिता म्हणते,”कृपया मला बोलू द्या”. तर छोटा पुढारी म्हणतो,”बोला.. आठ दिवस बोलली नाही…आता बोला.”
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या ‘भाऊच्या धक्क्या’चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,”‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सरप्राईजचा आहे. पण आता मी एक सरप्राईज देणार आहे. कोणालाच माहिती नाही, यंदा ‘बिग बॉस’ने एका प्रेक्षकाला या घरात एन्ट्री दिली आहे. ते घरातच आहेत.. त्यांची घरावर नजर आहे.. ते लपूनछपून तुमचा खेळ पाहतायत, दाद देत आहेत… पण स्वत: काहीही करत नाहीत. त्या प्रेक्षकाला मी तुमच्यासमोर बोलावतोय.. आणि ते प्रेक्षक आहेत पंढरीनाथ कांबळे”.. त्यानंतर पॅडीने दिलेल्या लूकवर रितेश त्याला असा लूक देऊ नको असं म्हणतो”.