Vishakha Subhedar Post Jahnavi Killekar : सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुपरहिट ठरताना दिसत आहे. यात कलाकारांचे आपपसात होणार वाद, घरातील काम, गॉसिप्स यामुळे यंदाचे पर्व खूपच चर्चेत आहेत. नुकतंच बिग बॉसच्या घरात एक टास्क रंगला. या टास्कवेळी जान्हवी किल्लेकर आणि पंढरीनाथ (पॅडी) कांबळे यांच्यात मोठा वाद झाला. “पॅडी दादा आयुष्यभर अशी ओव्हर अॅक्टिंग करून थकले आहेत”, असे वक्तव्य जान्हवीने केले. जान्हवीने केलेले हे वक्तव्य घरातील सदस्यांना अजिबात आवडले नाही. त्यांनी यावरुन जान्हवीला विरोध केला. आता जान्हवीच्या या वक्तव्यावरुन सिनेसृष्टीतील कलाकार संताप व्यक्त करत आहेत.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. विशाखा सुभेदारने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने पंढरीनाथ कांबळे यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी पॅडी कांबळे यांना कमी लेखणं बंद करा, जरा बोलताना भान ठेवा, त्यांच्या नखाची किंमत नाहीये तुला असा सल्ला जान्हवी किल्लेकरला दिला आहे.
“केहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना.. पॅडी more power to u. विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक. निकी बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना “जोकर “म्हणालात.. ! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर. हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिम्मत लागते, ती तुमच्याकडे नाही.
गेली अनेकं वर्ष हे कामं तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट खूप. हे विधान निकी आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे आणि अगं ए मुली, तुझा जन्म कदाचित 2000 तला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात केली 1998 मध्ये. त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू बंड्या ज्याचे वेड अजून आहे महाराष्ट्राला..येड्यांची जत्रा मधला नयन राव, ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत. जान्हवी तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ नाही ते..
गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते..! आणि त्यांच्या विनोदाचा टाइमिंग याबद्दल तर तू बोलायचंस नाही. नखाची किंमत नाहीये तुला आणि वर्षाताईंचा तुम्ही खूप अपमान केलाय आतापर्यंत.. Game आहे game आहे असं म्हणतं मी दोन तीन एपिसोड पहिले, पण तुम्ही तर थांबतच नाही आहात. ताईंनी glamour मिळवून दिलं मराठी सिनेमाला… त्याकाळी सोशल मीडिया नव्हता बाई… त्यांच्या दमावर त्याकाळातल्या कलाकारां वरच्या प्रेक्षक प्रेमामुळे, नाटक सिनेमे हाउसफुल्ल व्हायचे..! त्यांना कमी लेखण बंद करा, जरा बोलताना भान ठेवा. विनोदा मुळे तो माणूस जगलाय, टिकलाय, 50 शी पूर्ण झालीय त्याची तरीही आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे तो, शांत आहे ह्याचा अर्थ अस नाहीये कीं त्याल सेल्फ respect नाहीये..!
आता थोडं पॅडी बद्दल.. पॅडी माऊली, तूझा खेळ तू खुप सभ्यपणे, हुशारीने, संयम बाळगून खेळतोयस मित्रा…! आता तर तू जोरात आलायस..! इतका हिडीस बोलल्यानंतर ही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीयत त्याबद्दल तुला सलाम… खचून जाऊ नकोस…! टास्क मध्ये जोर लावून खेळ मित्रा..! तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे दाखवून दिलस आज. एक उत्तम reactor असूनही तू रिऍक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खुप खुप कौतुक…! बाकी तुझ्या फळांनी मज्जा आणली. काय timing भन्नाट. निकीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत.. खरंतर जां रोज जां.. आणि तीचे वाळत घातले पापड असतील नां त्याच्यावर नाच. तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडा चा…! करियर वर बोलायच नाही….”, अशी लांबलचक पोस्ट विशाखा सुभेदार यांनी केली आहे.
दरम्यान बिग बॉसच्या घरात जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळे यांच्या करिअरबद्दल भाष्य केल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत. कोणाच्याही करिअरबद्दल असे बोलणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहेत. तर दुसरीकडे रितेश देशमुख यांनी या मुद्द्यावरुन जान्हवीचा क्लास घ्यावा, अशी मागणीही होत आहे.