‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कल्ला पाहायला मिळत आहे. स्पर्धकांमध्ये वाद, प्रेम, स्पर्धा रंगल्याचं दिसत आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात दोन नवे पाहुणे येणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दोन बाहुले आले आहेत. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण आहे. घरात बाळ येण्याच्या आनंदात दोन्ही टीमने आपापल्या बाळांना सांभाळण्याचा आदेश ‘बिग बॉस’ला दिला आहे. प्रोमोमध्ये निक्की तांबोळी, अरबाज पटेल, अंकिता प्रभू वालावलकर, वर्षा उसगांवकर हे सदस्य बाळाचा सांभाळ करताना दिसत आहेत. या नव्या पाहण्यांचा पाहुणचार करताना मात्र स्पर्धकांची दमछाक होणार आहे.
‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत, ‘घरात बेबी येण्याच्या आनंदात दोन्ही टीमने आपापल्या बेबींना सांभाळायचं आहे’. दरम्यान कुशीत बेबी असलेली निक्की सूरजकडे पाहून म्हणते,’बुक्कीत टेंगूळ आपण आईला देऊयात…’ तर दुसरीकडे वर्षा उसगांवकर बाळाला सांगतात, की निक्की नावाच्या बाईने हैदोस माजवला आहे. त्यानंतर ‘बिग बॉस’ बेबीचं लंगोट बदलण्याची वेळ झाली असल्याचं सांगतात. आता या लंगोट बदलण्यावरुन घरात काय धमाका होणार हे पाहावं लागणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात आर्या निक्कीला म्हणतेय, ‘इथे सगळेच गेम खेळायला आले आहेत’. त्यावर निक्की आर्याला म्हणते,’तू गेम खेळतेस की नाही हे मला माहिती नाही’. त्यावर आर्या म्हणते,’ मला गेम खेळायची गरज नाही… मला तुझा प्रॉब्लेम आहे’. निक्कीला उत्तर देत आर्या म्हणते,’तुला माझा प्रॉब्लेम आहे तर वीकेंडला वगैरे कोणती लिपस्टिक लावू, कोणता झुमका घालू, असं विचारत माझ्याकडे यायचं नाही’. त्यावर आर्या तिला होकार न बोलण्यास होकार देते.
बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुखने यंदाच्या भाऊच्या धक्क्यावरून मोठी घोषणा केली आहे. या आठवड्यात कुणीच एलिमिनेट होत नाहीये. त्याचं एक कारण आहे. कलर्स मराठीने ठरवलं आहे की आपलं चॅनेल नव्याने लॉन्च करायचं. या नव्या लूकमधील कलर्सची टॅगलाईन आहे, ‘नवी उभारी, उंच भरारी’ म्हणून या आठवड्यात कुणीही एलिमिनेट होणार नाही. कुणीही घराबाहेर जाणार नाही, असं रितेश देशमुखने जाहीर केलं आहे.