‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जंगलराज’; बिग बॉसच्या घरात काय घडतंय?

| Updated on: Sep 17, 2024 | 3:22 PM

Bigg Boss Marathi House : 'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता नव्या एका टास्कमुळे 'बिग बॉस मराठी' चर्चेत आलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात 'जंगलराज' पाहायला मिळत आहे. नेमकं काय घडलंय? 'जंगलराज' काय आहे? वाचा सविस्तर...

बिग बॉस मराठीच्या घरात जंगलराज; बिग बॉसच्या घरात काय घडतंय?
बिग बॉस मराठी
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सिझन चांगलाच गाजतो आहे. स्पर्धकांमधील भांडणं अन् वाद चर्चेत असतातच. पण आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील टास्क चांगलात चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात टास्कमध्ये 50 दिवसांनंतरही तेवढीच मजा येत आहे. प्रत्येक टास्कमध्ये सदस्य मजा करण्यासोबत राडा आणि धुमाकूळ घालताना दिसत आहे. पण आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्यात जंगलराज असलेलं पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हा टास्क आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जंगलराज’ पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या प्रोमोत काय?

‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या प्रोमोमध्ये, ‘बिग बॉस मराठी’च्या घरावर या आठवड्यात जंगलराग असणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिकाऱ्याची बंदूक जास्तीत जास्त मिळवणारी टीम या कार्यात यशस्वी होईल. टास्कमध्ये डीपी स्टॅटर्जी आखताना दिसत आहे. आपल्याला ते षडयंत्र वापरावं लागेल, असं तो म्हणतो. तर अरबाज म्हणतोय, काहीही करा लीड आपल्याला करायचं आहे. निक्की तिचं मत मांडते. टीम वाटलीच पाहिजे, असं निक्की म्हणते.

प्रोमोमध्ये शेवटी जान्हवीला दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात पार पडणाऱ्या जंगलराजमध्ये कोण राज्य करणार आणि कोण बंदूक मिळवून कोण ठरणार खरा शिकारी? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

डीपीची भूमिका काय असणार?

आजच्या भागात अंकितासोबत काय वाकडं झालंय का? असं अभिजीत डीपीला हे विचारताना दिसणार आहे. त्यावर उत्तर देत डीपी उत्तर देतो. बस्स झालं.. जवळीक एका मर्यादेपर्यंतच बरी. जिथे मला वाटेल अडचणीत आहे तिथे मी उभा राहणार. बाकीवेळेस माझ्याकडून तू अपेक्षा करू नकोस. पुस्तकाची पाने भरपूर आहेत. तुम्ही उजव्या बाजूचीच पाहत आहात. डाव्या बाजूलाही लेखकाने कष्ट घेतले आहेत. तुम्हाला उजव्या पाणावर लिहायला जी मजा येत आहे ती डाव्या पानावर येत नाही. पण नंतर डाव्या पाणावर लिहायलाच मजा येते, असं डीपी अभिजीतला म्हणतो. त्यामुळे आता पुढच्या काळात डीपीचा काय स्टँड असणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.