‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहावा आठवडा सुरु आहे. बिग बॉसच्या घरात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. अभिनेत्री निक्की तांबोळी हिने केलेलं विधान सध्या चर्चेत आलं आहे. बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आलाय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमो निक्की आणि अरबाज पटेल आणि वैभव चव्हाणविषयी बोलताना दिसत आहेत. निक्की अरबाजशी बोलताना वैभवबाबत वादग्रस्त विधान करते. वैभव त्याच्या बॉडीमुळे कार्यक्रमात दिसतोय, असं निक्की म्हणते. निक्कीचं हे विधान सध्या चर्चेत आहे.
वैभवला तुझ्या आणि माझ्यावर जळतो आहे. एका गोष्टीवरून नाही तर अनेक गोष्टीवरून त्याला आपल्यासोबत जेलेसी आहे. तुझा राग, गेम जास्त उभरून दिसतो. विकेंडच्या वार पण तूझ्याबद्दल बोलले जाते. तुझी निगेटिव्ह का होईना पण भाऊच्या धक्यावर बोलले जाते. त्यांना जेलिसी आहेत की त्याच्या बद्दल बोलले जात नाही. वैभव फक्त त्याच्या बॉडीमुळे इथे दिसत आहे, असं निक्की म्हणते. हा प्रोमो सध्या सोळ मीडियावर चर्चेत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धकांमध्ये दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे. आता आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आज भांड्याला भांड लागणार आहे. निक्की आणि जान्हवीमध्ये जेवण बनवण्यावरून मोठा वाद होणार आहे. निक्कीने घरातील ड्युटी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संपूर्ण घरालाच तिचा प्रचंड राग आलेला आहे.
बिग बॉस मराठीच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीवर ओरडते. तुला थोडी तरी लाज वाटत असेल तर मी जेवण बनवलेलं तू जेवणार नाहीस, असं जान्हवी म्हणते. तर माझ्या वाकड्यात गेलं तर मी गळाच पकडत असते, असं म्हणत निक्की तिला उत्तर देते. घरातला सदस्यांमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली आहे. टीम A मध्ये फूट पडलेली पाहायला मिळत आहे.’बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात अजून काय काय आपल्याला पाहायला मिळेल. निक्कीच्या अश्या बोलण्याने वैभव काय रिॲक्ट करेल. हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.