नवीन वर्ष सुरू झालंय, तसं नवीन नवीन गोष्टी समोर येतायत. टीव्हीच्या विश्वातून एक मोठं सरप्राइझ आलंय. टीव्हीवर Devon Ke Dev–Mahadev मालिकेत भोलेनाथची भूमिका करून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता मोहित रैना(Mohit Raina)नं लग्न केलंय. होय. ही बातमी त्याच्या चाहत्यांसाठी थोडी आश्चर्याची आहे. मोहितची एक मैत्रीण आहे हे कोणाला माहीत असेल तरच नवल. तिच त्याची मैत्रीण अदिती आता त्याची बायको झालीय. त्याच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडिया(Social Media)वर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होतायत.
शेअर केले फोटो
स्वत: अभिनेता मोहित रैनानं त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केलेत. लग्नाची ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे. त्याला चाहत्यांसह इंडस्ट्रीकडून शुभेच्छा मिळतायत. या गुड न्यूजनं चाहतेही खूप खूश दिसतायत.
‘तुमच्या शुभेच्छा हव्यात’
फोटो शेअर करण्यासोबतच मोहितनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की प्रेमात कोणतेही अडथळे नसतात, प्रेम सर्व अडथळ्यांवर मात करतं, सर्व अडथळे पार करतं, कठीण भिंती तोडतं. प्रेम आशेनं भरलेलंय. आमच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या आशेनं आणि प्रार्थनेच्या मदतीनं आम्ही आता दोन नाही तर एक झालो आहोत. या नवीन प्रवासासाठी आम्हा दोघांनाही तुमच्याकडून आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत – अदिती आणि मोहित…
मौनी रायसोबत जोडलं गेलं होतं नाव
अभिनेत्री मौनी रायसोबतच्या मोहित रैनाच्या नात्याच्या बातम्याही ऐकायला मिळायच्या. मात्र त्यानं हे वृत्त फेटाळून लावलं होतं. 2018मध्ये एका मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं, की तो आणि मौनी फक्त चांगले मित्र आहेत. दरम्यान, मोहित देवों के देव महादेव, मुंबई डायरी 26/11 आणि उरी द सर्जिकल स्ट्राइकमध्ये दिसलाय.