बिग बॉस मराठीचा दुसरा आठवडा सुरु आहे. आता बिग बॉसच्या घरात खऱ्या अर्थाने रंगत येऊ लागली आहे. कारण बिग बॉसच्या घरात आता ग्रुप तयार झालेत. कॅप्टन्सी कार्य पार पडलं आहे. यात कोकणाने बाजी मारली आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता प्रभू वालावलकर हिने बिग बॉस मराठीच्या घरातील पहिली कॅप्टन होण्याचा मान मिळवला आहे. ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ असं या खेळाचं नाव होतं. यात ‘कोकण हार्टेड गर्ल’ने बाजी मारली आहे. या खेळात डीपीदादा अर्थात धनंजय पोवर याची तिला मदत झाली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात काल ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ हे कॅप्टनसी कार्य पार पडलं आहे. या टास्कदरम्यान घरातील सर्व सदस्य सर्वोतोपरी प्रयत्न केला. बॉलिवूड गाजवणारी निक्की तांबोळी आणि रॅपर आर्या जाधवमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळालं आहे. एकमेकींसोबत भिडतानाचा त्यांचा प्रोमो समोर आला आहे. ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ या टास्क जिंकत अंकिता वालावलकरने पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळवला आहे. तर कॅप्टनला यंदा नक्की कोणते अधिकार मिळणार हे पाहावं लागेल.
अंकिता वालावलकर हिने कॅप्टन्सी जिंकली आहे. ती कॅप्टन झाल्यानंतर तिच्या टीम मेंबरने तिला कॅप्टन रूमपर्यंत नेलं. धनंजय पोवारने तिला उचलून घेत कॅप्टनरूममध्ये नेलं. यावेळी संपूर्ण टीमने तिचं अभिनंदन केलं. आधी मी माणसं कमावली आणि त्या माणसांच्या सोबतीने मी कॅप्टनशिप पटकावली…. बिग बॉसच्या पहिल्या कॅप्टन पदाचा भार मी याच माणसांच्या मदतीने सांभाळणार आहे. बाकी प्रेक्षकाक काळजी…, असं म्हणत अंकिताच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनीही तिचं अभिनंदन केलं आहे.
घरच्या ड्यूटीवरून अंकिता आणि घन:श्याममध्ये वाद झाला. गार्डन एरियातील क्लिनिंगवरून अंकिता आणि घन: श्याममध्ये वाद झाला. गार्डन एरियामधील क्लिनिंग आपण करणार नसल्याचं घन: श्यामने म्हटलं आहे.