आज रक्षाबंधन आहे… बहिण- भावाच्या प्रेमाचा हा दिवस… आज बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. ज्याना भाऊ नाही ते आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरं करतात. कलाकारही आपल्या भावंडांसोबत रक्षाबंधन साजरं करत असतात. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस मराठीतील स्पर्धक अंकिता वालावलकर हिच्या सोशल मीडियावर आज रक्षाबंधनच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. अंकिता आणि तिच्या बहिणींचा खास फोटो शेअर करण्यात आला आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने बहिणींबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.
अंकिता वालावलकर सध्या बिग बॉसच्या घरात आहे. पण आज रक्षाबंधननिमित्त तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात तिच्या दोन लहान बहिणींसोबतचे हे फोटो आहेत. लहानपणी आपण मांजरांना राखीबांधत रक्षाबंधन साजरं केलं. मी तुम्हाला मिस करतेय. जे वाट्टेल ते मागवून खा. भांडू नका. रडू नका. लवकरच येते, असं अंकिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आज रक्षाबंधन लहानपणी भाऊ नाही म्हणुन मांजरांना राखी बांधत बांधत मोठे झालो. गावात खूप आतमध्ये राहतो त्यामुळे कोणी भाऊ असे रक्षाबंधनला आलेच नाहीत. आपण खूप भांडतो पण मी मोठी म्हणुन आई कायम मला सांगते “लक्ष ठेव हा गं ,बहिणी भांडतात पण विसरू नका हा एकमेकिना” .आज मी बिग बॉसमध्ये जरी असले तरी तुम्हाला मिस करत असेन. तुम्हाला काही कमी पडू नये अशी व्यवस्था करून आलेय. काळजी घ्या. ताईचे पैसे संपतील कसा ऑर्डर करू असा विचार करुन मन मारून राहू नका. जे वाट्टेल ते मागवून खा. भांडू नका. रडू नका. लवकरच येते.
तुमची, ताई…
28 जुलैला बिग बॉस मराठी सुरु झालं. बिग बॉसच्या घरात जाण्याआधाही अंकिता आणि तिच्या बहिणींनी रक्षाबंधन साजरं केलं होतं. याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. बिग बॉसच्या आधीचं आमचं रक्षाबंधन, असं म्हणत अंकिताच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करण्यात आले होते.