हिमाचलप्रदेशात दरड कोसळल्यानंतर FIR फेम अभिनेत्री कविता कौशिक हीच्यावर आले मोठे संकट,चार दिवस घाटात कार अडकून पडली…

| Updated on: Jul 13, 2024 | 7:42 PM

अभिनेत्री कविता कौशिक घराघरात 'एफआयआर' या हिंदी  मालिकेने प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या हिंदी मालिकेतील तिचे चंद्रमुखी चौटाला हे पात्र प्रचंड प्रसिद्ध झाले आहे.

हिमाचलप्रदेशात दरड कोसळल्यानंतर FIR फेम अभिनेत्री कविता कौशिक हीच्यावर आले मोठे संकट,चार दिवस घाटात कार अडकून पडली...
f.i.r fem actress kavita kaushik
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

हिंदी टीव्ही मालिका ‘एफआयआर’ फेम अभिनेत्री कविता कौशिक हिच्यावर हिमाचल प्रदेशात संकट ओढवले आहे. कविता कौशिक आपल्या पतीचा वाढदिवस साजरा करायला बंद्रीनाथ येथे गेली होती. त्यावेळी अचानक वाटेत दरड कोसळल्याने कविता कौशिक हिची कार मोठ्या ट्रॅफीक जाममध्ये अडकली आहे. या जोशीमठ – बद्रीनाथ हायवेवर डोंगरच रस्त्यावर आल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. याचे थरारक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.या लॅण्ड स्लाईडींगने हजारो कार अडकून पडल्या आहेत. त्यामुळे अभिनेत्री कविता कौशिक हीला तिच्या पती सोबतचा बर्थडे सुट्टीचा प्लान आता सैनिकांनी प्रकल्पाग्रस्तांसा्ठी बांधलेल्या तंबूत साजरा करावा लागत आहे.

टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक एफआयआर या मालिकेमुळे चर्चेत आलेला चेहरा आहे. ही मालिका प्रचंड गाजलेली आहे. या मालिकेतील बिनधास्त इन्स्पेक्टर कविता कौशिक मात्र या नैसर्गिक संकटाने हबकून गेली आहे. तिचा पती रोनीत बिस्वास याच्या सोबत सुट्टी साजरी करण्याचा प्लान अखेर रद्द झाला आहे. कारणबद्रीनाथाच्या दर्शनासाठी ती हिमाचल प्रदेशात गेली होती. परंतू परतत असताना हायवेवर दरड कोसळ्याने हायवे जाम झाला आहे.

पतीचा बर्थडे साजरा करण्यासाठी गेली होती

कविता हीने डेहरा़डून ते बद्रीनाथ पर्यंतचा प्रवास एन्जॉय केला होता, त्यानंतर त्यांनी बद्रीनाथ भोले बाबांचे दर्शनही घेत आशीर्वाद घेतले. परंतू परतत असतानाच वाटेत मोठी दुर्घटना घडली. आणि ती लँडस्लाईडमध्ये अडकली. कविता आणि तिचे पती येथून अडकून चार दिवस झाले आहेत. ती पती रोनीतच्या बर्थेडे सेलिब्रेट करण्यासाठी 5 जुलै रोजी बद्रीनाथला गेली होती.

मोठा संकटाचा काळ

हायवेवर एक हजाराहून अधिक कार अडकल्या आहेत. निमलष्करी दल आणि पोलिस 24 तास काम करीत आहेत. जोशीमठ – बद्रीनाथ  हायवेची दुरुस्ती करण्यासाठी आणि दगड मातीचा ढीगारा हटविण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडून भूसस्खंलन होत आहे. ही मोठी संकटाची वेळ आहे.